अभिनेता पंकीत ठक्कर अन् प्राची ठक्कर लग्नाच्या तब्बल २० वर्षांनी घेणार घटस्फोट; सहा वर्षांपासून राहतायेत वेगळे


 

ही जोडी आहे अभिनेता पंकीत ठक्कर आणि अभिनेत्री प्राची ठक्कर. टीव्ही इंडस्ट्रीमधील नावाजलेला चेहरा असणारा पंकीत लवकरच त्याची पत्नी प्राचीपासून घटस्फोट घेणार आहे. लग्नाच्या जवळपास २० वर्षांनी हे दोघं घटस्फोट घेणार आहे. पंकीत आणि प्राचीने २००० साली घरच्यांच्या विरोधात जाऊन प्रेमविवाह केला होता. या दोघांना एक मुलगा देखील आहे.

पंकितने त्याच्या या घटस्फोटाबद्दल सांगितले की, “मी मागील काही काळापासून कोरोना संपायची वाट बघत आहे. जेणेकरून मी घटस्फोटासाठी अर्ज करू शकतो. मागच्या पाच वर्षांपासून आम्ही दोघे वेगवेगळे राहत आहोत. त्यामुळे आम्ही खूप आनंदात आहोत. आम्ही जरी वेगळे होणार असलो तरी एकमेकांचा सन्मान करतो. आमच्यात सर्व काही एकदम स्वच्छ आहे.”

मुलाबद्दल सांगताना पंकीत म्हणाला, “आमचा मुलगा त्याच्या आईसोबतच राहील. याबद्दल मला कोणतीच समस्या नाही. मी खूप लहान असताना माझ्या आईला गमावले आहे. त्यामुळे आईपासून दूर होण्याचे आणि तिच्याशिवाय जगण्याचे दुःख मला माहित आहे. मी आणि प्राची सहमतीने हा घटस्फोट घेणार आहोत.”

प्राचीबद्दल बोलताना पंकीत म्हणाला, “प्राची सुंदर आणि प्रतिभावान अभिनेत्रीसोबतच व्यक्ती म्हणूनही खूप चांगली आहे. मी नेहमी तिचा आदर करतो. मात्र कधी कधी गोष्टी आपल्या हातात नसतात. आम्ही सोबत राहण्याचा पूर्ण प्रयत्न केला, पण त्यात अयशस्वी झालो. वेगळे राहत असताना आम्हाला जाणवले की, आम्ही आता शांत आहोत. प्राची माझ्यापेक्षा ८ वर्षांनी मोठी असल्याने मी माझ्या कुटुंबाविरोधात जाऊन तिच्याशी लग्न केले होते.”

पंकीत ‘कभी सौतन कभी सहेली’ आणि ‘दिल मिल गए’ या मालिकांसाठी ओळखला जातो तर, प्राची ‘कसौटी जिंदगी की’, ‘सेठजी’, ‘हवन’ या मालिकांसाठी ओळखली जाते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘मैं तो खड़ी थी आस लगाए…’, रितिका श्रोत्रीच्या निरागसतेने नेटकऱ्यांना पाडली भुरळ

-कंगना रणौत करणार इंदिरा गांधींवर आधारित चित्रपटाचे दिग्दर्शन; म्हणाली, ‘माझ्यापेक्षा इतर कोणीही…’

-सुरेश रैनाला बॉलिवूड कलाकार आवडत नाहीत? आपल्या बायोपिकसाठी या दोन साऊथ कलाकारांची सुचवली त्याने नावे


Leave A Reply

Your email address will not be published.