पर्ल पुरीवर लागलेल्या बलात्काराच्या आरोपांदरम्यान एक व्हिडिओ आला समोर; मुलींबाबत बोलताना म्हणतो, ‘तुम्ही मुलींचा…’


प्रसिद्ध टीव्ही अभिनेता पर्ल वी पुरीला या महिन्याच्या सुरुवातीला म्हणजेच ४ जून रोजी मुंबई पोलिसांनी अटक केली होती. त्याच्यावर इंडस्ट्रीत काम देण्याच्या निमित्ताने एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. अभिनेत्याला पॉस्को कायद्याअंतर्गत अटक करत न्यायालयीन कोठडीत पाठवले आहे. तो सध्या तुरुंगात आहे. बाहेर मात्र त्याला न्याय मिळण्यासाठी अनेक कलाकार पाठिंबा देत आहेत. टीव्ही इंडस्ट्रीतील अनेक प्रसिद्ध कलाकारांपासून ते चित्रपट दिग्दर्शक आणि निर्माती दिव्या खोसला कुमार हिनेही पर्लला पाठिंबा दर्शवला आहे. यासोबतच तिने अभिनेता निर्दोष असल्याचे सांगितले आहे.

सर्व कलाकारांचे असे म्हणणे आहे की, पर्ल असे करूच शकत नाही. त्याला खोट्या गुन्ह्यात अडकवले जात आहे. पर्ल नेहमीच मुलींचा खूप आदर करतो. तो सेटवरही सर्वांसोबत खूप चांगल्या पद्धतीने वागतो. आता या आरोप- प्रत्यारोपामध्ये अभिनेत्याचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये तो मुलींबाबत असं काही म्हणतो की, ते ऐकून तुम्हीही खुश व्हाल.

व्हायरल व्हिडिओत पर्ल कारमधून जाताना दिसत आहे. यावेळी तो मुलींचा आदर करण्याबाबत बोलत आहे. तो म्हणतो की, “आदर ही अशी गोष्ट आहे, जेव्हा तुम्ही ते करता, तरच ते तुम्हाला परत मिळेल. तुम्ही मुलींचा आदर केला नाही, तर तुम्ही त्या आदराच्या लायक नाहीत. त्यामुळे मुलींचा आदर करणे खूप गरजेचे आहे. त्यांनी आनंदी राहणे खूप गरजेचे आहे. कारण जर मुली खुश राहिल्या, तर जग खुश राहील, नेहमीच हसत राहील.”

खरं तर पर्लचा जामीन २ वेळा फेटाळण्यात आला आहे. त्याला सर्वप्रथम वसईच्या न्यायालयात ५ तारखेला दाखल करण्यात आले होते. तिथे त्याच्या जामीनाची याचिका फेटाळली होती. त्यानंतर त्याला न्यायालयीन कोठडीत पाठवले होते. पर्ल वी पुरीने पुन्हा एकदा जामीनासाठी अर्ज केला होता, जो ११ जूनला झालेल्या सुनावणीदरम्यान पुन्हा एकदा फेटाळण्यात आला होता. आता त्याला जामीन मिळतो की नाही, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.


Leave A Reply

Your email address will not be published.