Monday, March 4, 2024

धक्कादायक! ‘या’ प्रसिद्ध गायकाच्या पत्नीनेच त्याच्यावर लावला बलात्काराचा आरोप, पोलिसात तक्रार दाखल

गायक आणि मीडिया इंफुलएन्झर असणारा दानिश मिर्झा खूपच लोकप्रिय आणि प्रसिद्ध आहे. त्याला सोशल मीडियावर मोठी फॅन फॉलवोइंग असून, आजच्या तरुणाईच्या गळ्यातील तो ताईतच बनला आहे. नेहमी आपल्या गाण्यामुळे आपल्या व्यावसायिक आयुष्यामुळे मीडियामध्ये तो गाजत असतो. मात्र आता दानिश एका वेगळीच बातमीमुळे लाइमलाईट्मधे आला आहे.

दानिश मिर्झा हे नाव कोणासाठी तसे नवीन नाही. दानिशने त्याच्या आवाजाने आणि गाण्यांनी सतत लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे. मात्र सध्या दानिश एका मोठ्या आणि गंभीर आरोपांमुळे चर्चेत आला आहे. दानिशच्या पत्नीनेच त्याच्यावर बलात्कार आणि क्रूरतेचे गंभीर आरोप केले आहे.

 

दानिशच्या पत्नीच्या आरोपांवरून मुंबई पोलिसांनी त्याच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. तिने केलेल्या आरोपानंतर दानिशवर विविध कलमांतर्गत आरोप दाखल करून त्यावर आता चौकशी सुरु केली आहे.

मुंबईच्या ओशिवारा पोलीस ठाण्यात ही तक्रार दाखल करण्यात आली असून, दानिशच्या पत्नीने त्याच्यासोबतच त्याच्या आईवर आणि भावावर देखील आरोप केले आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले दानिश मिर्झा आणि इतर नातेवाईकांवर भारतीय संविधानाच्या अंतर्गत कलम ४९८ ए आणि ३७६ च्या मध्ये तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणात आता पोलीस अधिक चौकशी करत आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘उर्फी जावेद आहे ट्रान्सजेंडर’, ‘कोर्टातही सिद्ध करणार’, मॉडेलच्या दाव्याने सर्वत्र खळबळ, वाचा संपूर्ण प्रकरण
दोन-दोन वेळा संसार थाटणारे मराठी कलाकार आहेत तरी कोण?

हे देखील वाचा