Sunday, December 3, 2023

पहिल्या घटस्फोटानंतर ‘या’ टीव्ही अभिनेत्याने पुन्हा बांधली पत्रकार असणाऱ्या लिव्ह इन पार्टनरसोबत

टेलिव्हिजन इंडस्ट्रीमधील हँडसम आणि प्रतिभावान, लोकप्रिय अभिनेता अशी ओळख असलेला अभिनेता म्हणजे विवियन डीसेना. विवियन विविध मालिकांमधून प्रेक्षकांच्या समोर आला आहे. अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये त्याने काम केले. विवियन जेवढा त्याच्या व्यावसायिक आयुष्याबद्दल गाजला तेवढाच तो त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल देखील तुफान गाजला त्याने अभिनेत्री वाहबीज डोरबाजीसोबत लग्न केले होते. मात्र दुर्दैवाने त्यांचा घटस्फोट झाला. आता हे तर सर्वाना माहित आहे. मात्र आता विवियनने देखील आयुष्यात पुढे जात दुसरे लग्न केले आहे.

विवियनच्या घटस्फोटानंतर त्याचे नाव अनेकदा मिस्रच्या राहणाऱ्या नूरन अलीसोबत जोडले गेले. मात्र याबाबत त्याने कधीच समोर येउन काही सांगितले नव्हते. आता मात्र विवियनने नूरनसोबत अतिशय गुपचूप पद्धतीने लग्न केल्याची माहिती समोर येत आहे. मीडियामधील माहितीनुसार विवियन आणि नूरन अली मागील एक वर्षांपासून सोबत राहत आहे. त्यांनी सिक्रेट लग्न केल्याचे सांगितले जात आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Vivian Dsena (@viviandsena)

मात्र अजूनही विवियनकडून याबाबत कोणतीही माहिती आलेली नाही. सांगितले जात आहे की, त्याला त्याचे लग्न गुप्त ठेवायचे असल्याने त्याने कोणालाही याची माहिती दिली नाही. यासोबत मीडियामधील माहितीनुसार सध्या ही दोघं मुंबईच्या लोखंडवाला येथील एका फ्लॅटमध्ये राहत आहे. यासोबतच हे देखील सांगितले जात आहे की, ते मागील एक वर्षांपासून लिव्ह इन मध्ये देखील राहत होते. त्याला अधिक लिव्ह इनमध्ये राहायचे नसल्याने त्याने गुपचूप तिच्याशी लग्न केले.

मिस्रची राहणारी नूरन पेशाने एक पत्रकार आहे. एका वर्षांपूर्वी एका मुलाखतीमध्ये विवियनने सांगितले होते की, चार वर्षांपूर्वी नूरनने त्याच्याशी मुलखात देण्यासाठी संपर्क केला होता. मात्र त्यानंतर तब्बल तीन महिन्यांनी त्याने तिला मुलाखत दिली होती. हीच त्यांची पहिली भेट होती. त्यांच्यात मैत्री झाली आणि पुढे प्रेम झाले. एका मुलाखतीपासून सुरु होणारी त्यांची ही प्रेमकहाणी आता लग्नापर्यंत पोहचली आहे. अजूनपर्यंत विवियनकडून यावर काहीच प्रतिक्रिया आली नाही. त्याला त्याचे वैयक्तिक आयुष्य वैयक्तिक ठेवायला जास्त आवडते.

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
पहाटे 2 वाजता प्राइवेट प्रॉपटीमध्ये पॅपराझींच्या एंट्रीवर सैफ अली खान म्हणाला, ‘कुठे आहे मर्यादा?…’

आमिर खानच्या बोलण्यावर संतापले होते मोगॅंबो, नेमके काय होते कारण? एकदा जाणून घ्याच

हे देखील वाचा