Monday, June 24, 2024

परिणीती चाेप्राने ‘चमकिला’चा टीझर केला पाेस्ट; म्हणाली, ‘आपण त्यांचा आवाज ऐकला आहे, पण…’

पंजाबी म्युझिक इंडस्ट्रीतील प्रसिद्ध संगीतकार अमरसिंग चमकीला आज या जगात नाही, पण त्यांचे चाहते आजही त्यांच्यावर प्रेम करतात. अमरसिंग चमकीला हे पंजाबचे सर्वाधिक गाणी रेकॉर्ड करणारे कलाकार होते.
8 मार्च 1988 रोजी चमकिला यांची हत्या झाली. अशात आता या प्रसिद्ध गायकाच्या जीवनावर चित्रपट बनवला जात आहे, ज्याचे नाव आहे ‘चमकिला‘. मंगळवारी (दि. 30 मे)ला या चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आहे, ज्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

‘चमकिला’च्या 1 मिनिट, 22 सेकंदाच्या टीझरमध्ये, दिलजीत दोसांझ (diljit dosanjh) अमर सिंह चमकीला (amar singh chamkila) यांच्या लूकमध्ये अप्रतिम दिसत आहे. चित्रपटाच्या टीझरमध्ये एक गाणे देखील ऐकू येत आहे, ज्याचे बोल खरोखरच छान आहेत. ‘चमकिला’ चित्रपटाचा टीझर परिणीती चोप्रा (parineeti chopra) हिने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by @parineetichopra

हा टीझर पोस्ट करत अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये लिहिले की, “आपण त्यांचा आवाज ऐकला आहे, पण आता त्याची कथा ऐका… अमर सिंह चमकीला… नेटफ्लिक्सवर 2024मध्ये लवकरच येत आहे.” हा चित्रपट OTT प्लॅटफॉर्म Netflix वर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक इम्तियाज अली यांनी केले आहेत.

अमर सिंह चमकीला यांची 1988मध्ये पंजाब येथील जालंधरमधील मेहसमपूर गावात एका स्टेज शोसाठी जात असताना गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. यावेळी त्यांच्यासोबत त्यांची पत्नी आणि दोन लोकही उपस्थित होते. हल्लेखोरांनी अंदाधुंद गोळीबार सुरू केल्याने या सर्वांचा मृत्यू झाला. या बातमीने सर्वांनाच हादरवून सोडले हाेते.(bollywood movie chamkila teaser release diljit dosanjh first look in amar singh chamkila parineeti chopra in lead role in the late music sensation movie )

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही नक्की वाचा-
B’day Special | जेनिफर विंगेटचे ‘हे’ पाच बोल्ड लूक पाहून तुम्हीही पडाल तिच्या प्रेमात
“व्यक्तीरेखेचा खून केला होता…” किरण माने यांनी त्यांच्या ‘त्या’ वादावर आधारित शेअर केली सूचक पोस्ट

हे देखील वाचा