राहुल वैद्यच्या आनंदाला थारा नाही, कारण तो लवकरच वडिल होणार आहे. खरे तर, अलीकडेच दिशा परमारने आपल्या पतीला ती गर्भवती असल्याचे सांगून आश्चर्यचकित केले हाेते. अशात आता या जोडप्याने त्यांचे पहिले प्रेग्नेंसी फोटोशूट केले आहे.
आजकाल मॅटर्निटी फोटोशूट खूप लोकप्रिय आहे, अशा परिस्थितीत दिशा परमार (disha parmar) हिने तिचे पहिले प्रेग्नेंसी फोटोशूट केले आहे. दिशाने एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती तिचा बेबी बंप फ्लॉंट करताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये पती राहुल वैद्य तिच्यासोबत मजेत फिरत आहे. राहुल आणि दिशा या दोघांनीही ट्विन केलं आहे, ज्यामध्ये दोघेही खूप छान दिसत आहेत. व्हिडिओमद्ये दिशाने काळ्या रंगाच्या बॉडी एचक्यू ड्रेस परिधान केला आहे, तर राहुलने काळ्या रंगाच्या टी-शर्टमध्ये दिसत आहे. अशात या व्हिडिओमध्ये राहुल खूपच क्यूट दिसत असून कधी तो डान्स करताना दिसतोय, तर कधी पत्नीचे लाड करताना दिसतोय.
View this post on Instagram
व्हिडीओमध्ये दिशा परमार आणि राहुल वैद्य एक स्लेट हातात घेऊन त्यावर कमिंग सून लिहिलेले दिसत आहेत. यासाेबतच राहुल आणि दिशा एकमेकांना किस करताना देखील दिसत आहे, ज्यानंतर राहुल अचानक डान्सिंग मोडमध्ये येतो. दिशाही जोरात चालताना राहुलसाेबत नाचायला लागते, तेव्हाच राहुल तिची काळजी घेत बेबी बंपचा लाड करतो. मग यादरम्यान राहुल ‘आजा बेबी जल्दी आजा’ म्हणताना ऐकू येत आहे.
View this post on Instagram
दिशा आणि राहुलचा हा व्हिडिओ चाहत्यांना खूप आवडला आहे. व्हिडिओला कॅप्शन देत दिशा परमारने लिहिले की, ‘या व्हिडिओला कोणत्याही कॅप्शनची गरज नाही.’ व्हिडीओमध्ये राहुल वैद्यने गायलेले गाणे ‘कितनी खूबसूरत होगी तेरी मेरी प्रेम कहानी’ असून चाहत्यांना ते प्रचंड आवडले आहे. (tv actress disha parmar shared a post with her pregnancy photoshoot singer rahul vaidya seen extremely happy in video)