टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील सर्वात बोल्ड अभिनेत्री म्हणून निया शर्मा ओळखली जाते. नियाची सुरुवातीला साधी आणि सोज्वळ अभिनेत्री अशी ओळख होती. मात्र काही काळाने नियाने ही ओळख पुसली. आता नित्य तिच्या हॉट आणि ग्लॅमरस अवतारासाठी ओळखली जाते. सध्या ती तिच्या नवीन ‘जमाई राजा 2.0’ च्या दुसऱ्या सिजनसाठी खूप चर्चेत आहे. नुकताच ‘जमाई राजा 2.0’ सिजन २ चा ट्रेलर प्रदर्शित झाला असून, याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
या दरम्यान नियाने एका मुलाखतीमध्ये तिने दिलेल्या इंटिमेट सीन्सवर भाष्य केले आहे. नियाने ‘जमाई राजा 2.0’ सिजन १ आणि २ या दोन्ही वेबसिरीजमध्ये बरेच बोल्ड सीन आणि किसिंग सीन्स दिले आहेत, त्याबाबत तिने काही गोष्टींचा खुलासा केला आहेत.
यावेळी नियाने सांगितले की, ” ज्यावेळी अनेक कलाकार ओटीटी प्लॅटफॉर्मवर एन्ट्री करण्याचा विचार करत होते, तेव्हा मी इथे एन्ट्री केली होती. खरं तर मी खूप सुरुवातीलाच ओटीटी प्लॅटफॉर्मवर एन्ट्री केली. तेव्हा कोणीच जरा हटके आणि वेगळे करण्याच्या तयारीत नव्हते तेव्हाच मी ‘ट्विस्टेड’ सीरीज केली. तेव्हाच मी कधीही न केलेल्या अनेक गोष्टी केल्या, त्याचमुळे पुढे मी त्या गोष्टींमध्ये नॉर्मल होती. मला बोल्ड सीन आणि किसिंग सीन करताना कोणत्याही प्रकारचा ऑकवर्डनेस नव्हता.”
यानंतर तिने रवी दुबेसोबत दिलेल्या किसिंग सीनवर बोलताना सांगितले, ” जेव्हा जेव्हा मी रवीसोबत काम करते तेव्हा तेव्हा मी खूपच कम्फर्टेबल असते. तो खूपच समजुदार आणि सभ्य अभिनेता आहे. त्याच्यासोबत असे सीन्स करायला मला काहीच प्रॉब्लेम नाही. शिवाय अशा सीन्समध्ये त्यानेच मला खूप मदत केली.”
“अशा सीन्समध्ये माझ्यापेक्षा जास्त रवीच खूप टेन्शनमध्ये आणि नर्व्हस असायचा. तेव्हा मी त्याला मदत करायची. या शो च्या मागच्या सिजनमध्ये किसिंग सीन देताना मीच रवीला मदत केली होती. मात्र आता ह्या सिजनमध्ये रवी नॉर्मल होता,” असेही ती म्हणाली.
नियाचा सहअभिनेता असलेला रवीने सांगतो की, ” मी माझ्या १५ वर्षाच्या करियरमध्ये पहिल्यांदाच असे सीन दिले आहेत. याला मला माझ्या बायकोने सरगून खूप मदत केली आणि पाठिंबा देखील दिला.”
हेही वाचा
–सनी लिओनीने वाढवला इंटरनेटचा पारा, बिकिनीमधील बोल्ड फोटो केला शेअर, चाहतेही झाले घायाळ
–हुश्श! बहुचर्चित ‘रुही’ सिनेमाचा ट्रेलर अखेर प्रदर्शित; राजकुमार राव- जान्हवी दिसणार मुख्य भूमिकेत, पाहा व्हिडिओ
–तीन हजार चिनी सैनिकांशी लढलेल्या भारताच्या १२५ बहाद्दूर सैनिकांची स्टोरी दिसणार या वेबसिरीजमध्ये, पाहा ट्रेलर