Sunday, December 8, 2024
Home वेबसिरीज तीन हजार चिनी सैनिकांशी लढलेल्या भारताच्या १२५ बहाद्दूर सैनिकांची स्टोरी दिसणार ‘या’ वेबसिरीजमध्ये, पाहा ट्रेलर

तीन हजार चिनी सैनिकांशी लढलेल्या भारताच्या १२५ बहाद्दूर सैनिकांची स्टोरी दिसणार ‘या’ वेबसिरीजमध्ये, पाहा ट्रेलर

गेल्या दोन तीन वर्षात भारतात ओटीटी प्लॅटफॉर्म अर्थात ओव्हर द टॉप प्लॅटफॉर्म खूपच रुळला आहे. यावर भारतीय नवनवीन गोष्टी सतत पाहात असतात. यातीलच एक प्रकार म्हणजे ५-२० एपिसोडची मिळून केलेली सिरीज अर्थात वेबसिरीज. आता हाच प्रकार भारतीयांमध्ये चांगलाच लोकप्रिय ठरत आहे. यात हिंदी, इंग्रजीपासून प्रादेशिक भाषाही मागे नाहीत. तर याच वेबसिरीजच्या दुनियेत अनेक सिरीज अशाही आल्या, ज्या देशावर किंवा देशभक्तीवर आधारलेल्या होत्या. काहीशा या थाटणीची नवी वेबसिरीजही लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

ही वेब सिरीज आहे ‘१९६२: वॉर इन द हिल्स’. १९६२चा ट्रेलर सोमवारी रिलीज झाला आहे. या सीरिजमध्ये 125 सैनिकांची कहाणी आहे, ज्यांनी तीन हजार चिनी सैनिकांसोबत लढाई केली होती.

या सिरीजचे दहा भाग ‘चारुदत्त आचार्य’ यांनी लिहिले आहेत आणि त्याचे दिग्दर्शन ‘महेश मांजरेकर’ यांनी केले आहे. या सिरीजमध्ये केवळ युद्छाचे चित्रण केले नसून सैनिकांचे व्यक्तिगत जीवन आणि देशसेवेसाठी केलेले त्यांचे बलिदान सुद्धा उत्तम रितीने चित्रित केले आहे.

अभय देवल या सिरीजमध्ये मेजर ‘सूरज सिंग’ यांचे पात्र निभावत आहेत. जी ‘कंपनी’ नावाच्या एका बटालियनचे नेतृत्व करत आहेत. या सीरिजमध्ये ‘आकाश ठोसर’ ‘सुमीत व्यास’, ‘रोहन गंडोत्रा’, ‘अनुप सोनी’, ‘मियांग चेंग’, ‘माही गिल’, ‘रोसेल राव’, ‘हेमाल इंगले’ हे मुख्य भूमिकांमध्ये दिसणार आहेत.

अंदाजे सात वर्षांआधी भारतीय सैनिकांनी आपल्या देशाच्या महत्त्वाचा भाग असलेल्या लढाखच्या सुरक्षेसाठी अदम्य साहस किंवा बहादुरीचा परिचय दिला होता आणि ती लढाई आपण आजपर्यंत लढत आहोत. या सिरीजमध्ये त्याच एकशे पंचवीस सैनिकांची कहाणी आहे, ज्यांनी मोठ्या हिंमतीने 3000 चिनी सैनिकांसोबत युद्ध केले होते आणि त्यांच्या साहसाने या लढाईची गोष्टच बदलून गेली होती.

ही कहाणी त्या शूर सैनिकांची आहे ज्यांनी युद्धावेळी त्यांच्याकडे कमजोर हत्यारे असतानासुद्धा खूप जास्त संख्येने आलेल्या शत्रू सैनिकांना आपल्या सीमेमध्ये घुसून तोडफोड करण्यापासून थांबवले होते. हे सेनेच्या इतिहासामध्ये सगळ्यात महत्त्वाच्या युद्धांपैकी एक आहे.

‘डॉन ली’ यांनी  ॲक्शन सिक्वेन्सला कोरिओग्राफ केले

विश्वप्रसिद्ध ॲक्शन कोरियोग्राफर ‘डॉन ली यांनी’ या सीरीजमध्ये सर्व ॲक्शन सिक्वेन्सला कोरिओग्राफ केले आहे आणि त्यांनी सिरीजमध्ये प्रत्येक सैनिकाची लढाईची पद्धत दाखवली आहे. ‘डॉन ली’ हे एक विख्यात ॲक्शन कोरियोग्राफर असून त्यांनी अनेक मोठ्या बॅनरबरोबर काम केले आहे, जसे की ‘पायरेट्स ऑफ कॅरिबियन’, ‘स्टार ट्रेक’.

या सीरीजचे शुटिंग लडाख आणि भारताच्या सीमावर्ती गावांमध्ये झाले आहे, ज्याच्यामुळे दिग्दर्शकाला यात वास्तविकता आणि विश्वसनीयता आणता आली आहे. संगीत हा प्रत्येक कहानीचा एक अतूट हिस्सा आहे. या सिरीजमध्येही एक चांगले संगीत ऐकायला मिळणार आहे. या सिरीजचे संगीत ‘हितेश मोदक’ यांनी दिले आहे.

हेही वाचा-
जयहिंद! कोणत्याही देशभक्ताने न चुकता पाहायलाच हव्यात अशा पाच हिंदी वेबसिरीज
नव्या वर्षात या वेबसिरीज आणि चित्रपटांचा असेल बोलबाला; पाहा प्रदर्शनाचे ठिकाण आणि तारखा
सर्वांचा लाडका आकाश ठोसर दिसणार आर्मी ऑफिसरच्या भूमिकेत, त्याचा नवीन दमदार लुक ठरतोय चर्चेचा विषय

 

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा