Wednesday, July 3, 2024

आपल्या सौंदर्याच्या जोरावर तरूणांच्या गळ्यातील ताईत बनली पूजा, ‘या’मुळे खास असेल यंदाचा वाढदिवस

अभिनेत्री पूजा बॅनर्जीने (Puja Banerjee) कोरोना काळात केलेल्या मदतीमुळे तिचे सर्वत्र कौतुक करण्यात आले होते. अशा अनेक सामाजिक उपक्रमात सहभागी होणार्‍या या लोकप्रिय अभिनेत्रीचा रविवारी (६ जानेवारी) वाढदिवस आहे. या खास निमित्ताने जाणून घेऊ या तिच्याबद्दल खास गोष्टी…

‘कहानी हमारे महाभारत की’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली पूजा बॅनर्जी, एक लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. तिने आपल्या कारकिर्दीत अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये काम केले. एक हरहुन्नरी कलाकार म्हणून तिची अभिनय क्षेत्रात ओळख आहे. आज तिचा वाढदिवस खूपच खास असणार आहे. याचे कारण म्हणजे, मागच्याच वर्षी तिने एका गोंडस मुलाला जन्म दिला होता. त्यामुळे मुलासोबत हा तिचा पहिला वाढदिवस ठरेल.

अभिनेत्री पूजा सध्या आपल्या वैवाहिक आयुष्यात व्यस्त आहे. २०२०मध्ये तिने टीव्ही अभिनेता कुणाल वर्मासोबत (Kunal Verma) विवाह केला होता. त्यांच्या या विवाह सोहळ्यात कोरोनाने चांगलाच अडथळा आणला. खरंतर पूजा आणि कुणालला त्यांचा विवाह सोहळा धुमधडाक्यात करायचा होता, मात्र कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे त्यांना हे लग्न पुढे ढकलावे लागले. मात्र लॉकडाऊन संपण्याची काही चिन्हे दिसत नसल्याचे पाहून दोघांनी रजिस्टर पद्धतीने लग्न केले. त्यांनी आपल्या लग्नाचा सगळा खर्च कोरोना काळात मदतनिधी म्हणून दिला. त्यांच्या या समाजोपयोगी निर्णयाचे सर्वत्र कौतुक करण्यात आले होते. पूजाचा ‘मा वैष्णोदेवी’ हा कार्यक्रम चांगलाच लोकप्रिय ठरला होता. मात्र गरोदरपणामुळे तिला मध्येच हा कार्यक्रम सोडावा लागला.

दरम्यान पूजाने फक्त टीव्ही मालिकांमध्येच नाही तर ‘विदु थेडा’ ‘चॅलेंज २’ ‘रॉकी’ अशा अनेक तेलुगू आणि बंगाली चित्रपटातही काम केले आहे. ती ‘झलक दिखला जा ७’ मध्येही सहभागी झाली होती. पूजाने ‘तुझ संग प्रीत लागी साजना’ , ‘कहानी घर घर की’, ‘किस देश मे है दिल मेरा’, ‘कस्तुरी’ अशा लोकप्रिय मालिकांमध्ये काम केले आहे. तसेच ‘राजधानी एक्सप्रेस’ या हिंदी चित्रपटातसुद्धा ती झळकली आहे.

हेही वाचा :

हे देखील वाचा