Monday, March 4, 2024

क्या बात है! ‘आशिकी 4’मध्ये प्रियांका अन् अंकित दिसणार रोमांस करताना,साजिद खान खुलासा करत म्हणाला…

बिग बॉसमध्ये अनेक प्रेमकथा उमलल्या, तर अनेक जाेडपे वेगळेही झाल्याचे पाहायला मिळाले. यापैकी एक जाेडपे म्हणजे अंकित गुप्ता आणि प्रियंका चहर चौधरी.  शोमध्ये येताच हे स्पर्धक जाेडपे झाले हाेते. मात्र, अंकितच्या विचित्र वागण्यामुळे प्रियांकाने या नात्याला मैत्रीचे नाव दिले. तरीदेखील प्रेक्षकांना त्यांची जाेडी फारच आवडते. अशात त्यांच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे, साजिद खानने घोषणा केली आहे की, तो अंकित-प्रियांकासोबत ‘आशिकी 4’ बनवणार आहे.

‘बिग बॉस 16’मध्ये अंकित गुप्ता (ankit gupta) आणि साजिद खान (sajid khan) यांची बॉन्डिंग चांगलीच होती. शो संपल्यानंतरही त्यांनी आपला बाॅन्ड स्टाॅंग ठेवला आहे. अलीकडेच मीडियाने साजिद खान, प्रियांका चहर चौधरी आणि अंकितला एकत्र पाहिले. त्यानंतर पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. एका प्रश्नाच्या उत्तरात साजिद खानने गंमतीने सांगितले की, “आता तो ‘आशिकी 4’ बनवणार आहे आणि त्यात फक्त अंकित-प्रियांकाच कास्ट करणार आहे.”

साजिद खानने पुढे सांगितले की, “आजही तो अंकित आणि प्रियांकाशी फोनवर बोलतो आणि भेटतो. त्यांची मैत्री ऑन स्क्रिन नव्हती. शोमध्ये चांगले दिसायला हवे म्हणून आमची मैत्री झाली नाही, तर आम्हाला एकमेकांची कंपनी आवडते, म्हणून आम्ही मित्र बनलाे. मात्र, असे असवे तरी बाहेर पडल्यानंतर प्रत्येकजण आपापल्या कामात व्यस्त झाला आहे.

एमसी स्टेन आणि अब्दुल यांच्यातील लढतीवर साजिद खाननेही प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला, “मला वाटतं ते दोघे खूप तरुण आहेत. स्टेन 23 आणि अब्दूल 19 वर्षांचा आहे. मित्रांमध्ये अशी भांडणे होतच असतात. हे सामान्य आहे आणि ही काही मोठी गोष्ट नाही. मला खात्री आहे की, अब्दुल भारतात आल्यावर आम्ही त्याला भेटू आणि एकदा त्याने स्टॅनला मिठी मारली की, सगळे विसरून सर्व ठिक हाेईल.” असे साजिद खान याचे मत हाेते.(tv actress priyanka chahar choudhary ankit gupta romance aashiqui 4 sajid khan direct this film)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा :
‘इथे हे सर्वांसोबतच होते’ गरम मसाला फेम अभिनेत्रीने दिला प्रियांकाच्या ‘त्या’ विधानाला पाठिंबा

‘सर्जा’चा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित, चित्रपटात झळकणार ‘हे’ नामवंत चेहरे

हे देखील वाचा