Tuesday, February 18, 2025
Home टेलिव्हिजन राखी सावंतच्या नाट्यमय जीवनावर आधारित गाणं रिलीज, पाहा संपूर्ण स्टाेरी

राखी सावंतच्या नाट्यमय जीवनावर आधारित गाणं रिलीज, पाहा संपूर्ण स्टाेरी

ड्रामा क्वीन राखी सावंत कोणत्या ना कोणत्या कारणाने सतत चर्चेत असते. अशात गेल्या काही महिन्यांपासून राखी तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. तिच्या लग्नाची माहिती समाेर आल्यापासून राखीने आदिल दुर्रानीवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. हे प्रकरण आता इतके वाढले आहे की, आदिल पोलिसांच्या ताब्यात आहे. ड्रामा क्वीनचा नवरा तुरुंगात आहे, तर राखी कामावर परतली आहे. दरम्यान, आता राखी सावंतचा एक म्युझिक व्हिडिओ प्रदर्शित झाला आहे. या गाण्याचं नाव ‘झुठा’ असे आहे.

राखीचे ‘झुठा’ हे गाणं आज म्हणजेच शुक्रवारी (दि. 10 मार्च)ला प्रसिद्ध झाले. या गाण्यााचा टीझर काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित करण्यात आला हाेता, ज्यानंतर आज हे गाणं प्रेक्षकाच्या भेटीला आले आहे. राखीच्या या गाण्याला रिलीज हाेऊन दाेन तास झाले असून सात हजार व्ह्यूज मिळाले आहेत. तसेच हे गाणं राखीच्या खऱ्या आयुष्यावर आधारित आहे, अशा प्रकारच्या कमेंट्स साेशल मीडिया युजर्स करत आहेत.

‘झुठा’ या गाण्याविषयी बाेलायचे झाले, तर हे गाणं अल्तमाश फरिदीने गायले आहे. या गाण्याची निर्मिती व दिग्दर्शन कोरिओग्राफर मुदस्सर खानने केले आहे. या गाण्यात राखी व्यतिरिक्त सलमान शेखने मुख्य कलाकार म्हणून काम केले आहे.(tv actress rakhi sawant jhootha song released with salman shaikh amid conflict with husband adil khan hrc)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘या’ मेकअप आर्टिस्टशिवाय बॉलिवूड स्टार्स आहेत अपूर्ण, एका सिटिंगसाठी आकारतात तब्बल इतकी रक्कम

‘मला जळणाऱ्या कब्री दिसायच्या’ बिग बॉस फेम सना खानने सांगितले खतरो के खिलाडीला नकार देण्याचे कारण

हे देखील वाचा