Monday, July 1, 2024

रश्मीने बाबा सिद्दिकीच्या पार्टीत केले ‘असे’ काही कृत्य, व्हिडिओ पाहून लाेकही म्हणाले…

दरवर्षीप्रमाणे या वर्षीही बाबा सिद्दीकी यांनी इफ्तार पार्टीचे आयोजन केले होते, ज्यामध्ये सलमान खान, शहनाज गिल, भारती सिंग, प्रीती झिंटा, जास्मिन भसीन यांच्यासह अनेक स्टार्सने उपस्थिती लावली. मात्र, या संपूर्ण पार्टीची लाइमलाइट शहनाज गिल आणि रश्मी देसाई होत्या. या पार्टीत रश्मी देसाईने शहनाज गिलसाेबत असे काही कृत्य केले, ज्यामुळे अभिनेत्री सोशल मीडियावर चांगलीच ट्रोल होत आहे. काय आहे नेमके प्रकरण? चला जाणून घेऊया…

बाबा सिद्दीकी (baba siddique) यांच्या पार्टीतील रश्मी देसाई (rashami desai) हिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर जाेरदार व्हायरल होत आहे. इंटरनेटवर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये रश्मी देसाई एका मैत्रिणीशी बोलताना दिसत आहे. मात्र, शहनाज गिल (shehnaaz gill) आत येताच रश्मी देसाई तिच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करते आणि तेथून निघून जाते.

 

View this post on Instagram

 

A post shared by @varindertchawla

सोशल मीडिया युजर्सचे म्हणणे आहे की, रश्मी देसाईने शहनाज गिलला पार्टीत जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. ‘किसी का भाई, किसी की जान’ या चित्रपटातील अभिनेत्रीसोबत रश्मी देसाईचे वागणे लोकांना अजिबात आवडले नाही, त्यामुळे युजर्स अभिनेत्रीला चांगलेच ट्राेल करत आहेत.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओवर चाहते वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर काही लोक रश्मी देसाईला ‘जलकुकडी’ म्हणून संबोधत आहेत. व्हिडिओवर कमेंट करताना एका युजरने लिहिले की, ‘रश्मीला शहनाज गिलचा खूप हेवा वाटतो, आज तिने हे सिद्ध केले आहे.

shehnaaz gill

shehnaaz gill
shehnaaz gill

रश्मी देसाई आणि शहनाज गिल ‘बिग बॉस सीझन 13’मध्ये एकत्र दिसल्या होत्या. अशात ‘दिल से दिल तक’ फेम अभिनेत्रीचा बिग बाॅस शोमध्ये सिद्धार्थ शुक्लासोबतचा 36चा आकडा होता, तर दुसरीकडे या शोमध्येच शहनाज गिलसोबत सिद्धार्थचे नाते घट्ट झाले हाेते.(tv actress rashami desai ignore shehnaaz gill at baba siddique iftar party users troll bigg boss 13 contestant called her jealous)

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
महिमा चौधरीला तिच्या कॅन्सरमधून बरे होण्यासाठी ‘हा’ शो ठरला महत्वाचा, अभिनेत्रीने मानले आभार

आर माधवनचा लेक वेदांतने पुन्हा एकदा देशासाठी जिंकली 5 सुवर्णपदके; अभिनेता म्हणाला, “आम्हाला अभिमान आहे…”

हे देखील वाचा