Tuesday, June 18, 2024

शिव ठाकरे ‘बिग बॉस’ विजेता व्हावा म्हणून अमरावतीमध्ये केली जातेय प्रार्थना अन् होम-हवन, वाचा बातमी

अखेर ‘बिग बॉस 16‘मध्ये वेळ आली आहे, जेव्हा सीझनमधील विजेत्याचे नाव घोषित केले जाईल. शिव ठाकरे, शालिन भानोट, एमसी स्टॅन, प्रियांका चहर चौधरी आणि अर्चना गौतम या पाच स्पर्धकांमध्ये ट्रॉफीसाठी चढाओढ सुरु आहे. या सगळ्यांपैकी महाराष्ट्राच्या लाडक्या शिवला चाहत्यांप्रती तुफान प्रतिसाद मिळत आहे. अमरावतीच्या खसादार नवनीत राणा, आमदार बच्चू कडू याच्यासह अनेक राकारण्यांनी आणि अमरावतीत राहाणाऱ्या अनेक चाहत्यांनी शिव ठाकरेच विजेता ठरावा यासासाठी आवाहन करण्यात आलं आहे.

यंदाचा बिग बॉस 16 पर्व शिव ठाकरे (Shiv Thakare) ने गाजवला. मैत्री असावी तर शिवच्या मंडळी सारखी हे त्याने बिग बॉसच्या घरात सिद्ध केलं आहे. भान ठेवून बोलणं आणि प्रेमळ स्वभावाने शिवने चाहत्यांच्या मनात मोठं स्थान निर्माण केलं. शिव टीव्ही क्षेत्रात आघाडीचा अभिनेता असला तरी गरिब कुटुंबातून पुढे येऊन यशाचं मोठं शिखर गाठलं आहे. बिग बॉसच्या घरातही त्याला अनेक गोष्टींचा सामना कारावा लागला होता.

एकेकाळी कुटुंबाची मदत करण्यासाठी शिवने वर्तमानपत्र विकण्याचेही काम केले. आर्थिक स्थिती पाहून त्याने नृत्याचे वर्ग सुरू केले, तेथून हळूहळू त्याला चांगली कमाई होऊ लागली. शिवने आपल्य करिअरची सुरुवात रोडिजपासून केली होती तिथूनच तो प्रेक्षकांच्या नजरेत उतरला. यानंतर शिवने मराठी बिग बॉस पर्व 2 मध्ये आला असुन आपल्या दमदार खेळीने बॉग बॉसच्या ट्रॉफीवर नाव कोरलं ज्यानंतर शिव प्रसिद्धी झोतात आला. त्यामुळे हिंदी बिग बॉस 16 चाही विजेता शिवच व्हाया यासठी अमरावतीमध्ये गल्ली गल्लीत प्रर्थना आणि होम-हवन सुरु आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
जया बच्चन यांनी उपाध्यक्ष जगदीप धनखर यांच्याकडे दाखवले बोट, राज्यसभेच्या कामकाजादरम्यान घडली घटना
अभिमानास्पद! आर माधवनच्या मुलाने केली सुवर्ण कामगिरी; ट्वीट शेअर करत अभिनेता म्हणाला,’खूप कृतज्ञ…’

हे देखील वाचा