Tuesday, October 14, 2025
Home अन्य आनंद गगनात मावेना! ‘बिग बॉस’चे विजेतेपद पटकावल्यानंतर पहाडी गाण्यावर थिरकली रुबीना, पाहा जबराट व्हिडिओ

आनंद गगनात मावेना! ‘बिग बॉस’चे विजेतेपद पटकावल्यानंतर पहाडी गाण्यावर थिरकली रुबीना, पाहा जबराट व्हिडिओ

नुकतेच टीव्हीवरील प्रसिद्ध रियॅलिटी शो ‘बिग बॉस १४’ च्या विजेत्या स्पर्धकाचे नाव घोषित केले होते. ती विजेता स्पर्धक इतर कोणी नसून अभिनेत्री रुबिना दिलैक ही आहे. बिग बॉसचे विजेतेपद पटकावल्यानंतर ती आपल्या कुटुंब आणि मित्रांसोबत सेलिब्रेशन करताना दिसत आहे. ती सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. तिने विजेतेपद पटकावल्यानंतर आपल्या चाहत्यांसाठी फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत. रुबीनाचा जन्म हा शिमलाचा आहे. तिचे आपल्या शहरावरील प्रेम बिग बॉसमध्ये पाहायला मिळाले आहे. ट्रॉफी घरी आणल्यानंतर तिने एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ती आपल्या पहाडी (लोकगीत) गाण्यावर डान्स करताना दिसत आहे.

रुबीनाने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओ शेअर करत तिने अभिनवला टॅग केले आहे. यासोबतच तिने #bosslady आणि #jungleboy असे हॅशटॅग्ज दिले आहेत.

या व्हिडिओत ती पहाडी गाण्यावर ठुमके लावताना दिसत आहे. हे लोकनृत्य करण्यामध्ये तिचा पती अभिनव शुक्लाही तिला पूर्ण साथ देत आहे. या व्हिडिओत ती काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये मस्तीच्या अंदाजात डान्स करत आहे. अभिनव निळ्या रंगाच्या शॉर्ट्स आणि ग्रे रंगाच्या टी-शर्ट्समध्ये दिसत आहे. दोघांची जोडी सुंदर दिसत आहे. त्यांच्या या व्हिडिओवर चाहत्यांकडून कमेंट्सचा पाऊस पडत आहे.

यापूर्वीही रुबीना बिग बॉसमध्ये घरातील व्यक्तींसोबत हिमाचल प्रदेशचे लोकनृत्य करताना दिसली होती. तिने म्हटले होते की, ती पहाडन असल्यामुळे तिला सलमान खानसोबत बिग बॉसच्या मंचावर हिमाचल प्रदेशचे लोकनृत्य करायचे आहे.

रुबीनाने आपल्या अभिनयाने सर्वांचे मन जिंकले आहे. तिला टीव्हीवरील ‘छोटी बहू’ या कार्यक्रमामुळे जबरदस्त प्रसिद्धी मिळाली होती. या मालिकेतूनच तिने टीव्ही इंडस्ट्रीमध्ये पाऊल ठेवले होते. ‘छोटी बहू’चे २ सिझनमध्ये झळकल्यानंतर रुबीनाने ‘शक्ति: अस्तित्व का अहसास’ या मालिकेत मुख्य भूमिका साकारली होती. यामधील तिच्या अभिनयालाही पसंती मिळाली.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-व्हिडिओ: ५ वर्षे रिसर्च करून बनवलेला दाक्षिणात्य चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला, बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूरने केला टिझर शेअर

-बॉलिवूड अभिनेत्री उर्वशीने कापले १० किलो कांदे, चारच तासात व्हिडिओला मिळाले १९ लाखांपेक्षा अधिक व्ह्यूज

-अबब! उर्वशी रौतेलाचा ५० लाखांचा बोल्ड अँड ब्युटीफुल लुक, पाहा या लूकचे दोन खास व्हिडीओ

हे देखील वाचा