Sunday, December 8, 2024
Home टेलिव्हिजन ‘काटा लगा गर्ल’ शेफालीने वयाच्या चाळीशीत बिकिनी घालून केला कहर, फाेटाे व्हायरल

‘काटा लगा गर्ल’ शेफालीने वयाच्या चाळीशीत बिकिनी घालून केला कहर, फाेटाे व्हायरल

काटा लगा गर्ल‘ म्हणून प्रसिद्ध असलेली शेफाली जरीवाला तिच्या बोल्ड लूकमुळे नेहमीच चर्चेत असते. नुकतेच तिने बिकिनीमधील तिचे लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत, जे पाहून काही लोकांच्या हृदयाचे ठोके वाढले आहेत, तर काही लाेकांनी तिला ट्राेल केले आहे.

खरे तर, सोशल मीडियाचे तापमान वाढवत शेफाली जरीवालाने तिचे काही हॉट फोटो इंस्टाग्राम हँडलवर शेअर केले आहेत. फोटोंमध्ये, अभिनेत्री स्काय ब्लू बिकिनी परिधान करून पती पराग त्यागीसोबत स्विमिंग पूलमध्ये मजा करताना दिसली. एका फोटोमध्ये ती पतीच्या खांद्यावर बसून पोज देताना देखील दिसली होती. हे मस्त फोटो शेअर करताना शेफाली म्हणाली- ‘समर मूड 24/7’.

आपल्या बोल्ड लूकने इंटरनेटवर धुमाकूळ घालणाऱ्या शेफालीची ही फाेटाे पाहता, अनेक चाहते तिचे कौतुक करत आहेत, तर दुसरीकडे काही युजर्स तिला बेशरम म्हणत ट्रोल करत आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिले की, ‘लाज वाटू द्या.’ तर दुसऱ्या युजरने कमेंट करत म्हटले की, “बेशरम.”

शेफाली जरीवाला ‘नच बलिये’, ‘बूगी वूगी’ आणि ‘बिग बॉस’मध्ये दिसली आहे. मात्र, ‘काटा लगा’ या गाण्यातून तिला चांगलीच लोकप्रियता मिळाली. शेफालीने दोन लग्न केले आहेत. तिचे पहिले लग्न 2004 मध्ये संगीतकार हरमीत सिंगसोबत झाले होते, ज्यांच्यापासून तिचा 2009मध्ये घटस्फोट झाला होता. मग शेफालीने 2014 मध्ये पराग त्यागीसोबत लग्न केले.

पराग त्यागी हा छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेता आहे. त्याने ‘पवित्र रिश्ता’, ‘अघोरी’, ‘रात्री की यात्री’, ‘काला टिका’ आणि ‘ब्रह्मराक्षस’ सारख्या शोमध्ये काम केले आहे. एकता कपूरच्या ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेतून त्याला चांगलीच लोकप्रियता मिळाली. या शोमध्ये तो अर्चनाच्या (अंकिता लोखंडे) भावाच्या भूमिकेत दिसला होता.(tv actress shefali jariwala trolled for her bikini photos with husband parag tyagi )

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
“आम्ही विनोदवीर नाही”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम पृथ्वीक प्रतापचे मोठे वक्तव्य, म्हणाला…
‘थोडी सी जो पी ली है’, आमिरच्या गेट टुगेदर पार्टीत कपिलच्या गायकिने वेधले सर्वांच लक्ष, व्हिडिओ व्हायरल

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा