Wednesday, July 3, 2024

‘खतरों के खिलाडी 13’मध्ये शीझान खानला कास्ट केल्यामुळे संतापली तुनिषा शर्माची आई, चॅनला पाठवली कायदेशीर नोटीस

टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्मा मृत्यू प्रकरणातील आरोपी शीजान खानच्या अडचणीत वाढ होणार आहे. तुनिषाच्या आईने शीजानवर मोठी कारवाई केल्याचे वृत्त आहे. अलीकडेच कोर्टाने शीजानला परदेशात जाण्याची परवानगी दिली, त्यानंतर बातमी आली की, तो लवकरच रोहित शेट्टीच्या टीमसोबत ‘खतरों के खिलाडी 13‘च्या शूटसाठी जाणार आहे. अशात आता तुनिषाच्या आईने असे काही केले आहे की, ज्यानंतर चॅनललाही आपल्या निर्णयावर पुनर्विचार करावा लागणार आहे.

माध्यमातील वृत्तानुसार, शीजानवर सुरू असलेल्या खटल्यावर तुनिषाच्या आईने संबंधित चॅनलला नोटीस पाठवली आहे. त्या म्हणाली की, ‘माझ्या मुलीच्या मृत्यू प्रकरणातील आरोपी, जो नुकताच जामिनावर तुरुंगातून बाहेर आला आहे, त्याला चॅनल इतक्या लोकप्रिय शोमध्ये कसे घेऊ शकतं.’

त्या पुढे म्हणाल्या, ‘एखाद्याविरुद्ध खटला सुरू असेल आणि आरोपपत्र त्या व्यक्तीविरुद्ध असेल, तर ते त्याला शाेमध्ये कसे दाखवणार? ‘अलीबाबा’ हा त्याचा पहिला लीड शो होता आणि या संपूर्ण घटनेपूर्वी त्याला कधीही ऑफर आली नव्हती. अशात आता अचानक त्याला ‘खतरों के खिलाडी’ची ऑफर आली? कशाच्या आधारावर? तुनिषासोबत जे काही घडले त्यामुळे तो प्रसिद्धीच्या झोतात आला. चॅनल काय संदेश देत आहे? ते टीआरपीसाठी गुन्हेगाराला प्रोत्साहन देत आहेत. आम्ही कायदेशीर मार्गाचा अवलंब करू.’

मंडळी, गेल्या वर्षी 24 डिसेंबरला ‘अली बाबा दास्तान-ए-काबुल’ या मालिकेची मुख्य अभिनेत्री तुनिषा शर्माने सेटच्या खोलीत गळफास लावून आत्म’हत्या केली होती. तिच्या मृत्यूनंतर, तुनिषाच्या आईने अभिनेत्रीचा प्रियकर आणि सहकलाकार शीझान खानला जबाबदार धरले आणि त्याच्याविरुद्ध एफआयआर दाखल केली. परिणामी पाेलिसांनी शीजानला ताब्यात घेतले आणि बराच काळ तुरुंगात ठेवले हाेते.(tv actress tunisha sharmas mother vanita sharma sends a legal notice to colors on roping in sheezan khan for rohit shetty show khatron ke khiladi )

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
प्रियांका चाेप्राचा आकाशी रंगाचा डिसायनर गाऊन चर्चेत, फाेटाे व्हायरल

स्विमिंगपूलमध्ये सारा अली खानसोबत दिसणाऱ्या ‘मिस्ट्री मॅन’ला पाहून मीडिया आणि नेटकऱ्यांमध्ये चर्चांना उधाण

हे देखील वाचा