‘बिग बॉस ओटीटी‘च्या पहिल्या सीझनमध्ये भाग घेऊन प्रसिद्धीच्या झाेतात आलेली उर्फी जावेद हिने ‘ये रिश्ता क्या कहलाता है’, ‘बेपन्ना’, ‘भैया की दुल्हनिया’ आणि ‘मेरी दुर्गा’ या सारख्या अनेक टीव्ही मालिकांमध्ये सहाय्यक भूमिका साकारल्या आहे. अभिनयापेक्षाही उर्फी तिच्या बोल्डनेसमुळे चर्चेत असते. उर्फी दररोज तिच्या ड्रेसिंग सेन्सने लोकांना आश्चर्यचकित करते. अशा परिस्थितीत उर्फी पुन्हा एकदा तिच्या लूकमुळे चर्चेत आली आहे. ईदनिमित्त उर्फीचे नवीन फोटो समोर आले आहेत, ज्यावर साेशल मीडिया युजर्सने संताप व्यक्त करत अभिनेत्रीला ट्राेल केले आहे.
आज म्हणजेच 22 एप्रिल 2023 रोजी देशभरात ईदचा सण साजरा केला जात आहे. एकीकडे, स्टार्स पारंपरिक लूकमध्ये त्यांचे खास फोटो आणि व्हिडिओ शेअर करून चाहत्यांना ईद मुबारकच्या शुभेच्छा देत आहेत. त्याचवेळी उर्फीने तिचे असे काही फोटो शेअर केले आहेत की, युजर्स तिला चांगलेच ट्राेल करत आहेत.
उर्फी जावेदने ईदच्या निमित्तानं तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर आपले नवीनतम फोटो पोस्ट केले आहेत. या फाेटाेंमध्ये उर्फी पुन्हा एकदा बोल्डनेस दाखवताना दिसत आहे. उर्फीने इंस्टाग्रामवर मित्रांसोबतचे व्हेकेशनचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये उर्फी तिच्या मैत्रिणींसोबत स्विमिंग पूलमध्ये मस्ती करताना दिसत आहे, तर अनेक फोटोंमध्ये ती बिकिनीमध्ये पोज देताना देखील दिसत आहे.
View this post on Instagram
ईदच्या मुहूर्तावर उर्फीला बिकिनीमध्ये पाहून लोक संतापले आहे. युजर्स तिच्या फोटोंवर कमेंट करत तिला ट्राेल करत आहेत. उर्फीला ट्रोल करत एका युजरने लिहिले की, ‘तिला लाज वाटायला पाहिजे. अगदी ईदच्या दिवशीही या सगळ्या पोस्ट’, तर एकाने लिहिले, ‘ईदच्या दिवशी तर योग्य कपडे घालायचे हाेते. निर्लज्ज स्त्री.’ अशा अनेक कमेंट्स उर्फीच्या फोटोंवर येत आहेत.(tv actress urfi javed brutally trolled for share her bikini photo on eid 2023)
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
चाहत्याचा फोन हिसकावून पळाली राखी सावंत, ‘ड्रामा क्वीन’चं ‘हे’ कृत्य पाहून नेटकऱ्यांचा राग अनावर
…म्हणून शूटींगच्या सेटवर फराह खानने लगावली होती जुही चावलाच्या कानशिलात; अभिनेत्रीने स्वत: केला खुलासा