Thursday, April 25, 2024

रोहित शेट्टीच्या ‘इंडियन पुलिस फोर्स’ सिरीजचे शूटिंग संपले, स्टायलिश व्हिडिओ शेअर शिल्पाने दिली माहिती

यावर्षी दिग्दर्शक रोहित शेट्टी ओटीटी प्लॅटफॉर्मवर पदार्पण करणार आहे. त्याची ‘इंडियन पुलिस फोर्स’ या वेबसिरीजची शूटिंग पूर्ण झाली असून, याबद्दल अभिनेत्री शिल्पा शेट्टी हीने इंस्टाग्रामवरून माहिती दिली आहे. शिल्पाने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर रोहितसोबतचा एक व्हिडिओ पोस्ट करत केला आहे. या व्हिडिओमध्ये रोहित आणि शिल्पाचा एक नवीनच अंदाज दिसून येत आहे.

शिल्पा शेट्टीने हा व्हिडिओ पोस्ट करताना कॅप्शनमध्ये भावना मांडताना तिने रोहित शेट्टी आणि तिच्या टीमचे आभार मानले आहे. रोहित शेट्टी आणि तिच्या टीमसोबत काम करणे म्हणजे स्वप्न पूर्ण झाल्या सारखे असल्याचे तिने सांगितले. शिल्पाने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये ती रोहित शेट्टी आणि त्याच्या संपूर्ण टीमसोबत चालत येताना दिसत आहे. तिने या वेबसिरीजची शूटिंग पूर्ण झाल्याचे सांगताना हा प्रवास खूपच सुंदर आणि कायम स्मरणात राहणार असल्याचे सांगितले.

शिल्पाने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये ती, रोहित शेट्टी आणि टीम एका वेगळीच ऍटिट्यूडमध्ये आणि स्टाइलमध्ये दिसत आहे. शिल्पाने काळ्या रंगाचा ड्रेस आणि त्यावर कॅज्युअल शूज घातलेले दिसत असून, गॉगलने तिने तिचा लूक पूर्ण केला आहे/ या ड्रेस मध्ये ती खूपच स्टायलिश आणि सुंदर दिसत आहे. तर रोहित शेट्टीने निळ्या रंगाचा शर्ट, निळ्या रंगाची पँट आणि पांढऱ्या रंगाचे स्नीकर्स, गॉगल घातला आहे.

तत्पूर्वी रोहित शेट्टीच्या ‘इंडियन पुलिस फोर्स’ या वेबसिरीजची शूटिंग मागच्या वर्षीच सुरु झाली होती. या सिरीजमध्ये अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि विवेक ओबरॉय मुख्य भूमिकेत असून शिल्पा शेट्टी देखील महत्वाची भूमिका साकारणार आहे. प्राईम व्हिडिओवर प्रदर्शित होणाऱ्या या सिरीजच्या प्रदर्शनाची तारीख अद्याप समोर आलेली नाही.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
रवीना टंडन होणार पद्मश्री पुरस्काराने सन्मानित, जाणून घ्या अभिनेत्रीच्या आयुष्यातील न ऐकलेले किस्से
अभिनेत्री पूजा सावंतने गुपचूप उरकला साखरपुडा? व्हिडिओ व्हायरल

हे देखील वाचा