Tuesday, June 25, 2024

दादासाहेब फाळके पुरस्कार विजेत्यांवर कडाडली कंगना; सोशल मिडियावर स्वत:चीच यादी केली शेअर

अभिनेत्री कंगना ही तिच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमी चर्चेत असते. कंगना ही सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. ती नेहमी तिचे परखड मत मांडत असते. पुन्हा एकदा अशाच एका कारणामुळे चर्चेत आली आहे. सध्या चर्चेत असण्याचे कारण म्हणजे नुकताच मुंबईत पार पडलेला दादासाहेब फाळके पुरस्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात अभिनेत्री आलीय भट्ट हिला दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाला. त्यावर कंगनाने तिच्या सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात तिने काही कलाकारावर वादग्रस्त विधान करून टोमणा मारला आहे. चला बघूया कंगना तिच्या शेअर केलेल्या पोस्ट मध्ये काय म्हणाली आहे ते?

मुंबई मध्ये दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव नुकताच पार पडला. या कार्यक्रमात रणबीर कपूर, आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि वरुण धवन (Varun dhavan) यांना पुरस्कार मिळाला. त्यानंतर कंगना रनौत (Kangana Ranaut) हिने काही तासातच तिच्या सोशल मीडियावर एक पोस्ट केली. या पोस्ट मध्ये तिने पुरस्कार मिळालेल्या कलाकारांवर आक्षेप घेतला आहे. तिने तिची स्वतःचीच एक यादी बनवली आहे त्यात तिच्या मतानुसार विजेते ठरवले आहे. तसेच तिने पुढे एका पोस्ट मध्ये लिहले की, घराणेशाही पात्र असलेल्या लोकांचा हक्क हिसकावून घेत आहे असे लिहिले आहे.

तिची स्वतःचीच एक यादी बनवली यात तिने जी नवे जाहीर केली आहे. यात तिने या वर्षीचा तिच्या मते, ”सर्वोत्कृष्ट अभिनेता ऋषभ शेट्टी (कंतारा), सर्वोत्कृष्ट अभिनेत्री मृणाल ठाकूर (सीता रामम) सर्वोत्कृष्ट चित्रपट (कांतारा) सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक एसएस राजामौली (RRR), सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता अनुपम खेर (काश्मीर फाइल्स), सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री तब्बू (भूल भुलैया) अशी ती यादी आहे. ती पुढे म्हणते की, हे कलाकार जावो अगर ना जावो पुरस्कार त्यांचाच आहे. ते उपस्थित राहो ना राहो याने काही फरक पडत नाही. या चित्रपट पुरस्कारांची कुठलीही ऑथेंसिटी नसते. मला योग्य वाटणाऱ्या सर्वांची योग्य यादी तयार करेन… संपर्कात राहा… धन्यवाद.”

 

कंगनाने पुढे घराणेशाहीवर टीका केली आहे. ती पुढे म्हणाली, ‘जो कलाकार त्याच्या स्वतःच्या हिमतीवर या चित्रपट सृष्टीत त्याला दाबून टाकले जाते किंवा त्याचे करिअर उद्धवस्त केले जाते. हेच तुमचे कर्म आहे. पण मी आता शांत बसणार नाही तुम्हाला सगळ्यांना नष्ट करण्याचा मी निश्चय केला आहे. श्रीमद भगवत गीतेमध्येय सांगितले आहे कि वाईटाचा नाश करणे हे एक प्रमुख लक्ष असते.’ (kangana ranaut statement dadasaheb phalake award winners share social media post)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
viral video sonu nigam : धक्कादायक! मुंबईत म्युझिक कार्यक्रमादरम्यान सोनू निगमवर झाला हल्ला
देवदूताच्या रुपात आली होती श्रीदेवी; एका निर्णयाने बदलले चित्रपट निर्मात्याचे आयुष्य

हे देखील वाचा