बॉलिवूडची ‘कॉन्ट्रोव्हर्सी क्वीन’ राखी सावंत कोणत्या ना कोणत्या कारणाने सतत चर्चेत असते. काही दिवसांपुर्वी राखी आदिल दुर्रानीसाेबतचे प्रेम आणि नंतर भांडणामुळे चर्चेत हाेती. अशात आता राखी रमजानच्या पवित्र महिन्यात रोजा आणि नमाजच्या निमित्ताने चर्चेत आहे, ज्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अलीकडेच राखीचा आणखी एक व्हिडिओ साेशल मीडिायवर मोठ्या तुफान व्हायरल होत आहे, ज्यासाठी तिला ट्रोल केले जात आहे. काय आहे नेमके प्रकरण? चला जाणून घेऊया…
अलीकडेच राखी सावंत (rakhi sawant) हिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे, ज्यामध्ये अभिनेत्री नमाज अदा करताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये राखी काळ्या रंगाच्या सूटसोबत हिजाब परिधान करताना दिसत आहे. यासोबतच ती नमाज अदा करतानाही दिसत आहे. हा व्हिडिओ अपलोड होताच लोकांचे लक्ष राखीच्या कपड्यांकडे गेले आणि लोकांनी तिला चांगलेच ट्रोल केले.
राखीचा हा व्हिडीओ व्हायरल होताच युजर्सनी अभिनेत्रीला फटकारायला सुरुवात केली. एका युजरने कमेंटमध्ये लिहिले की, ‘कृपया राखी बहिणीची पॅन्ट खाली करा, इतके घातल्याने नमाज होत नाही.’, तर दुसऱ्या युजरने कमेंट करत म्हटले की, ‘तुम्ही नमाज अदा करत आहात, ही खूप चांगली गोष्ट आहे, पण कपडे पूर्ण असावेत. अशात एक युजर्स म्हणाला,’नमाज अदा करणे योग्य आहे, परंतु काही नियमांची काळजी घेणे देखील आवश्यक आहे. प्रथम, आपण पूर्ण कपडे घालावे आणि दुसरे म्हणजे, त्यांनी नेल पेंट लावलेले नसावे.’
View this post on Instagram
राखी विषयी बाेलायचे झाले, तर राखी 2022 मध्ये पती आदिल खान दुर्रानीच्या प्रेमात पडली होती, त्यानंतर दोघांनी लग्न केले. लग्नानंतर राखीने धर्म बदलून इस्लामचा स्वीकार केला. एवढेच नाही, तर राखीने तिचे नाव बदलून फातिमा ठेवले होते. आज जरी राखी पतीपासून वेगळी झाली असली तरी ती इस्लामच्या सर्व विधींचे पालन करत आहे.(tv avctress rakhi sawant brutally got trolled for her outfit during namaz see social media users reaction )
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
सुष्मिता सेनने पुन्हा पकडला एक्स बाॅयफ्रेंड रोहमन शॉलचा हात? अभिनेत्रीचा ‘ताे’ व्हिडिओ व्हायरल
‘आदिपुरुष’च्या पोस्टरमधील “ती” चूक दिग्दर्शक ओम राऊतच्या अंगाशी! टीमच्या विरोधात तक्रार दाखल