Monday, June 17, 2024

अय्याे! आदिल दुर्रानी 20 फेब्रुवारीपर्यंत तुरुंगात; राखी म्हणाली, ‘पहिल्यांदा इतिहास…’

सध्या राखी सावंत तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे माेठ्या प्रमाणात चर्चेत आहे. राखीने तिचा पती आदिल खान दुर्रानीवर मारहाण, हुंड्यासाठी छळ, फसवणूक असे अनेक आरोप करत एफआयआर दाखल केली हाेती, ज्यानंतर पोलिसांनी आदिलला ताब्यात घेतले. अशात आता जवळपास 15 दिवस तुरुंगात असलेल्या आदिलच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. गुरुवारी, (दि. 16 फेब्रुवारी) रोजी झालेल्या सुनावणीत अंधेरी न्यायालयाने आदिलला पुन्हा 20 फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. न्यायालयाच्या सुनावणीनंतर राखी सावंतने माध्यमांशी संवाद साधला आहे, ज्याचा व्हिडिओ साेशल मीडियावर माेठ्या प्रमाणात व्हायरल हाेत आहे.

आदिल खान दुर्रानी (adil durrani) 15 दिवसांपासून तुरुंगात आहेत. अशात अंधेरी कोर्टात झालेल्या सुनावणीत कोर्टाने आदिलला 20 फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. राखीच्या वकिलाने प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना ही माहिती दिली. ते म्हणाले, “आम्ही अनेक दिवस प्रयत्न करत होतो आणि आता न्यायालयाने आदिलला 20 फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.”

न्यायालयाच्या सुनावणीनंतर राखीने माध्यमांशी संवाद साधला. जिथे ती म्हणाली, ‘राखी सावंतला न्याय मिळाला नाही, तर भारतातील पीडित महिलेला न्याय मिळाला आहे. इतिहास पहिल्यांदाच रचला गेला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

राखीचा पती आदिल खान दुर्रानी याला पोलिसांनी न्यायालयीन सुनावणीसाठी न्यायालयात आणले होते. ज्याचा व्हिडिओही समोर आला आहे. मात्र, पॅपराझींने शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये आदिलचा चेहरा दिसत नाही.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

राखीशिवाय, एका इराणी विद्यार्थिनीने म्हैसूरमध्ये आदिल खान दुर्रानी यांच्यावर बला’त्कार, आक्षेपार्ह व्हिडिओ बनवणे आणि तिला धमक्या दिल्याचे आरोप करत गुन्हा दाखल केला आहे.(tv actress rakhi sawant adil durrani jailed till february 20 rakhi said created history for the first time)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
भांडं फुटलं रे! स्वरा भास्करने केले समाजवादी पक्षाच्या ‘फहाद अहमद’साेबत लग्न, पाहा व्हिडिओ

स्वरा भास्करने 4 वर्षांनी लहान फहाद अहमदशी केले लग्न, कोण आहे हा राजकीय नेता? वाचा सविस्तर

हे देखील वाचा