छाेट्या पडद्यावरील वादग्रस्त शाे ‘बिग बॉस 16‘मधील सर्वात लढाऊ स्पर्धकांपैकी एक अर्चना गौतम पुन्हा एकदा घरात गाेंधळ घालणार आहे. गेल्या आठवड्यात तिने शिव आणि साजिदच्या ताटातून चपात्या घेतल्या होत्या. आता चपातीच्या नासाडीवरून तिची घरातील सदस्यांशी भांडण झाली आहे.
बिग बॉस 16च्या (bigg boss 16) आगामी भागाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये अर्चना (archana gautam) घरातील सदस्यांचा क्लास घेताना दिसत आहे. संतापलेली अर्चना किचनमधून बाहेर पडते आणि सरळ बेडरूममध्ये जाते आणि सगळ्यांना चपात्या वाया घालवण्याच्या घाणेरड्या सवयीबद्दल म्हणते, “तुम्ही लाेक येणार – जाणार तर सेल्फवर एक नजर टाका, तिथे चपात्या ठेवल्या आहेत. कमीत कमी इतके तरी बघा की, तुम्ही ज्या चपात्या उषट्या टाकल्या आहेत त्या कशाप्रकारे ठेवल्या आहेत. काही लाेकांना तर चपाती मिळत सुद्धा नाही.” अर्चनाच्या बोलण्याला उत्तर देताना निमृत म्हणते, “ऐक, एक गोष्ट सांगू अर्चना, मी खात्रीने सांगते की, इथे जे लोक खातात, ते असे आहेत की, चार चपात्या केल्या तर चारपैकी चारही खातात. असाे, तसाही त्यांच्यावर आराेप आहे की, ते जास्त खातात.”
View this post on Instagram
हट्टी अर्चना किचनमध्ये जाऊन उरलेल्या चपात्या स्लॅबवर ठेवते आणि दारात उभी राहत सगळ्यांना वार्निंग देत सांगते की, “सगळे ऐका, मी पसरवलेल्या सात चपात्या. किचनमध्ये जाऊन बघा. थोडी लाज वाटून घ्या की, तुम्ही लोकं चपात्या वाया घालवता. तुम्ही ते दिवस विसरलात का जेव्हा तुम्ही कोरडी चपाती खायचे. तर भाऊ, तुम्ही जेवढं बनवणार तेवढं खा. नाहीतर त्यांना नवीन अन्न मिळणार नाहीत. माझ्याकडून तर अजिबातच नाही. आधी ते जुने अन्न संपवतील आणि मग नवीन मिळेल. मी अन्नाची नासाडी सहन करणार नाही.”
अर्चनाच्या या स्टेपला शोचे चाहते जोरदार पाठिंबा देत आहेत आणि तिच्या समर्थनात भरभरुन कमेंट करत आहेत. ( tv bigg boss 16 archana gautam roasted housemate for wasting roti including shalin bhanot tina datta nimrit kaur sajid khan shiv thakare)
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक वाचा-
ऋतिकने पत्नीचा पदर सोडताच पकडला सबा आजादचा हात, पाहा व्हायरल व्हिडिओ
जेनेलियाचा शाळकरी लुक चाहत्यांना करतोय घायाळ, बेसुरी गाण्याने तरुणाइला घतली भुरळ