Wednesday, August 6, 2025
Home बॉलीवूड दलजीत कौरने केले एक्स पती शालीन भनाेतला विजयी करण्याचे आवाहन; म्हणाली, ‘अनेक महिने कुटुंबापासून…’

दलजीत कौरने केले एक्स पती शालीन भनाेतला विजयी करण्याचे आवाहन; म्हणाली, ‘अनेक महिने कुटुंबापासून…’

उद्या म्हणजेच रविवारी 12 फेब्रुवारीला संध्याकाळी 7 वाजता बिग बॉसचा फिनाले सुरू होणार आहे. अशात आता बिग बॉस फिनालेमध्ये पोहोचलेला शालीनची एक्सी पत्नी दलजीत कौर हिने चाहत्यांना शालीन भानोतला विजयी करण्याचे आवाहन केले आहे. तिने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तिने शालीन भानोतचे कौतुक केले असून चाहत्यांना आवाहन केले आहे की, त्याला बिग बॉस 16 चा विजेता बनवा.

शालीन भानोत (shalin bhanot) ‘बिग बॉस 16’ च्या टॉप 5 स्पर्धकांपैकी एक आहे. त्यांच्याशिवाय यामध्ये शिव ठाकरे, एमसी स्टेन, अर्चना गौतम आणि प्रियांका चहर चौधरी हे देखील शर्यतीत आहेत. दलजीत कौर म्हणाली की, ‘शालीन भानोत बिग बॉसच्या घरात खूप चांगला खेळत आहे, त्याला माझ्याकडून शुभेच्छा!.’

 

View this post on Instagram

 

A post shared by ColorsTV (@colorstv)

दिलजीतने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक क्लिप शेअर केली आहे. यामध्ये ती म्हणतेय की, ‘बिग बॉस 16 चा फिनाले आहे आणि मला वाटतं की, हा शो खूप कठीण आहे. यामध्ये टिकून राहणे हे खूप अवघड काम असून यात पाचही जणांनी खूप मेहनत घेतली आहे. जो सर्वोत्कृष्ट असेल तो विजयी होवो.’

dalljiet kaur

दलजीत कौर पुढे म्हणाली, ‘मला आज शालीनला मत द्यायचे आहे. मला वाटते तुम्ही लोकांनी त्याला मत द्यावे. त्यांनी उत्तम काम केले आहे. इतके महिने कुटुंबापासून दूर राहणे, आपल्या सुखसोयीपासून दूर राहणे आणि जगणे ही खूप अवघड गोष्ट आहे, म्हणून मी तुम्हाला विनंती करते की, तुम्ही शालीनला विजेता बनवा. शालीनचेही खूप खूप अभिनंदन. वोटसाठी फक्त 2 दिवस बाकी आहेत. मी पाचही जणांना शुभेच्छा देते, वेळ आली आहे.’

 

View this post on Instagram

 

A post shared by Shalin Bhanot (@shalinbhanot)

दलजीत कौर बिग बॉस 13 मध्ये सहभागी झाली होती. यामुळे तिला खूप प्रसिद्धीही मिळाली, आता ती मार्चमध्ये निखिल पटेलसोबत लग्नबंधनात अडकणार आहे.(tv bigg boss 16 finale dalljiet kaur appeals to fans to make ex husband shalin bhanot winner see video)

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
ब्रेकअपनंतरही ‘या’ अभिनेत्रींने केले एक्स बॉयफ्रेंडसोबत चित्रपटात काम, पाहा यादी

कियाराच्या मंगळसूत्रासाठी सिद्धार्थने खर्च केले तब्बल इतके काेटी, वाचून तुम्हालाही बसेल धक्का

हे देखील वाचा