Friday, April 19, 2024

…म्हणून ‘झलक दिखला जा’च्या मंचावर ढसाढसा रडला करण जोहर, जाणून घ्या कारण

छाेट्या पडद्यावरील लोकप्रिय शाे ‘झलक दिखला जा’ सतत चर्चेत असताे. या रियलिटी शाेमध्ये माधुरी दीक्षित, नोरा फतेही आणि करण जाेहर परीक्षक आहे. तर मनीष पॉल होस्ट आहे. प्रत्येक आठवड्यात सेलिब्रिटी कंटेस्टेंट एका विशेष थीमवर परफॉर्मेंस करते आणि आपल्या डान्सने परीक्षकांचा आणि प्रेक्षकांचा जबरदस्त मनाेरंजन करते. अशातच अपकमिंग एपिसोड थीम कुटुंबावर आधारित आहे. जे सर्वांना भावूक करते. येत्या एपिसाेडमध्ये कंटेस्टेंट डान्सच्या आधारे फॅमिली बॉन्डिंग दाखवणार आहे. 

कलर्स टिव्हीने आपल्या इंस्टाग्रामवर अपकमिंग शोचा प्राेमाे शेअर केला आहे. ज्यात चित्रपट निर्माता करण जाेहर (karan johar) ढसाढसा रडत असल्याचे पाहायला मिळत आहे आणि माधुरी दीक्षित(Madhuri dixit), नोरा फतेही(Nora fatehi) त्याच सांत्वन करताना दिसत आहे. शाेचे कंटेस्टेंट निती टेलर आणि तिचा काेरियाेग्राफर आकाश थापाने करणच्या कुटुंबावर आपला परफॉर्मेंस दाखवला. ज्याला बघून करम भावूक झाला. शाेच्या प्राेमाेमध्ये दाखवले की, करणला त्याची मुलं यश जाेहर आणि रुही जाेहरची आठवण आली अन् ते भावूक झाले.

 

View this post on Instagram

 

A post shared by ColorsTV (@colorstv)

करण जाेहर त्याची मुलं यश जाेहर आणि रुही जाेहर यांच्यावर खुप प्रेम करताे. 2007 साली करण सेराेगेसीच्या साहाय्याने वडील झाला. त्याचे ‘झलक दिखला जा 10’ च्या सेटवर अश्रू अनावर झाले आणि त्याने ढसाढसा रडायला सुरुवात केली. प्राेमाेमध्ये नीती आणि काेरियाेग्राफरने करणच्या मुलांची भूमिका साकारून डान्स करताना दिसले. यादरम्यान एक व्हिडिओ प्ले करण्यात आला ज्यात यश आपल्या वडिलांसारखी पाेज देताना आणि बाेलताना दिसत आहे. याला बघून चित्रपट निर्माता भावूक झाला आणि म्हणाला, “यश आणि रुही माेठे झाले आहे. मी स्वत:ला खुप भाग्यवान समजताे की, यश रुही माझ्या आयुष्याचा हिस्सा आहे.”

निर्मात्याने या प्राेमाेला शेअर करत कॅप्शल लिहिले की, ‘नीति चा परफाॅर्मेस बघून करण जाेहर झाला भावूक, तुम्ही सुद्धा बघू इच्छिता या वीकेंडला त्यांचा डान्स परफॉर्म’? येत्या एपिसाेडमध्ये निया शर्मा (Nia Sharma) आणि पारस कलनावत आपला परफाॅर्मेंस वडिलांना डेडीकेट करणार आहे तर अमृता खानविलकर (amruta khanvilkar) आपल्या आईला परफाॅर्मेंस डेडीकेट करताना दिसणार आहे.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक वाचा :
प्रिया आनंदने ‘फुकरे’ चित्रपटातून मिळवली ओळख, ‘या’ व्यक्तीशी करायचे होते लग्न
प्रकाश झा यांनी अक्षय-शाहरुख-अजयची उडवली खिल्ली; म्हणाले, ‘गुटखा विकण्यात व्यस्त…’
वीस मिनिटात करायचाय मेकअप? वापरा आम्रपाली दुबेच्या ‘या’ टिप्स

हे देखील वाचा