‘गर्वाचं घर खाली असतं आणि तू तर…’, पुन्हा भिडले जय अन् मीनल


‘बिग बॉस मराठी’च्या तिसऱ्या पर्वात घरातील समीकरण बदलत चालली आहेत. खेळामध्ये बदल झाला, तरीही घरातील सदस्यांमध्ये काही बदल झालेला दिसत नाही. अजूनही त्याच मार्गाने घरातील सदस्य खेळ खेळत आहेत. घरातील जवळच्या व्यक्तीसोबत भांडण आहेत. अशातच आठव्या आठवड्यात येऊन देखील घरातील सदस्यांच्या मनात गैरसमज कायम आहेत.

घरात जय आणि मीनल पुन्हा एकदा एकमेकांना भिडले आहेत. या आठवड्यात साप्ताहिक कार्यात पुन्हा एकदा जय आणि मीनलमध्ये जोरदार भांडण झाल्याचे दिसून आले आहे. घरात जेव्हा कॅप्टन्सी कार्य चालू असते, तेव्हा मीनल म्हणते की, “तू घसरत गेलास परत.” यावर जय म्हणतो की, “मी कसं पण खेळेल तू मला सांगायचं नाही.” नंतर मीनल देखील खूप चिडते आणि म्हणते की, ‘मी बोलणार, मूर्ख मुलगा आहेस तू.” (Bigg Boss Marathi 3 : quarrel between jay dudhane and Meenal Shah)

मग जय म्हणतो की, “तू फट्टू आहेस फट्टू.” यानंतर मीनल म्हणते की, “गर्वाचं घर खाली असतं आणि तू त्यापेक्षाखाली आहे.” यानंतर विशाल येतो आणि म्हणतो की, “तो चुकला नाहीये, तो बरोबर आहे आता.” जवळचा मित्र आल्याने मीनल दुखावते आणि म्हणते की, “तू बोलायचं नाही, मी तुझ्याशी बोलत नाहीये.”

त्यामुळे आता पुढे नक्की काय होणार आहे, याची सगळ्यांना उत्सुकता लागली आहे. जय आणि मीनलचे भांडण चालू असताना विशाल मधे आल्याने आता त्यांच्यात भांडण होईल का? असे प्रश्न बिग बॉस चाहत्यांना पडले आहेत. या आठवड्यात घरात खूपच भांडण आणि शिवीगाळ झालेला दिसून आला आहे. अगदी सोनाली आणि मीरामध्ये देखील खूप भांडण आणि शिवीगाळ झाली आहे. त्यामुळे आता वीकेंडला मांजरेकर काय म्हणतील याची सगळ्यांना उत्सुकता लागली आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘तू मला परवानगी दिली म्हणून…’, सुंदर कॅप्शनसह स्मिता तांबेने केला तिच्या मुलीसोबतचा फोटो शेअर

-तुटले महाराष्ट्रातील तमाम तरुणांचे हृदय! ‘महाराष्ट्राची क्रश’ ऋता दुर्गुळे ‘या’ व्यक्तीला करतेय डेट

-अभिनेत्री ऋतुजा बागवेची सुंदरता अशी की, पाहून चाहताही म्हणाला, ‘दीपिका पदुकोणचे मराठी व्हर्जन’


Latest Post

error: Content is protected !!