Monday, April 15, 2024

कृष्णा अभिषेकने कपिल शर्मासाठी केला मोठा त्याग, ‘या’ मोठ्या दिग्दर्शकाच्या चित्रपटाला मारली लाथ

द कपिल शर्मा शो‘मधील सर्वात लोकप्रिय पात्र कृष्णा अभिषेक शोमध्ये परतला आहे. अलीकडेच त्याचा आणि कपिल शर्माचा प्रोमो रिलीज झाला होता, ज्यामध्ये कृष्णा ‘सपना दीदी’च्या लूकमध्ये दिसला हाेता. अशात कृष्णा अभिषेकने आता ‘द कपिल शर्मा शो’साठी एका चित्रपटाला नाकारल्याचा खुलासा केला आहे. अभिनेत्याने सांगितले की, त्याने एका मोठ्या दिग्दर्शकाचा चित्रपट शोसाठी सोडला आहे.

कृष्णा अभिषेकने माध्यमाशी केलेल्या संभाषणात खुलासा केला की, ‘त्याला साजिद खानने त्याच्या चित्रपटाची ऑफर दिली होती, परंतु त्याच्या सर्व तारखा ‘द कपिल शर्मा शो’साठी बुक करण्यात आल्या होत्या. त्यामुळेच त्याने हा चित्रपट करण्यास नकार दिला.’

अभिनेता म्हणाला, “काही समस्या होत्या. आमचा चॅनलसोबत आधीच करार होता आणि वेळापत्रक व्यस्त होते… साजिद खानने मला चित्रपटाची ऑफर दिली, ज्याचे शूटिंग तो आता करत आहे. तुम्ही त्याला विचारू शकता, मला त्याच्यासोबत काम करायला जास्त आनंद झाला असता.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Krushna Abhishek (@krushna30)

‘द कपिल शर्मा शो’मध्ये कृष्णाचे भव्य स्वागत करण्यात आले. शोमध्ये परतल्याची माहिती देतानाचा त्याने सेटवरील एक व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये कृष्णा सपना दीदीच्या लूकमध्ये दिसत आहे. कृष्णाने आपल्या जुन्या शैलीत सेटवर प्रवेश करताच प्रेक्षकांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्यांचे स्वागत केले. यासोबतच मैने प्यार किया या चित्रपटातील ‘दिल दीवाना’ हे गाणे बॅकग्राउंडमध्ये वाजत होते. त्याचवेळी किकू शारदासह त्याच्या सहकलाकारांनीही स्टेजवर अभिनेत्याचे स्वागत केले.

द कपिल शर्मा शोचा हा लेटेस्ट व्हिडिओ कृष्णा अभिषेकने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. पोस्टच्या कॅप्शनमध्ये त्याने शोमध्ये परतल्याची माहिती दिली. कॉमेडियनने लिहिले, “सपना परत आली आहे. माझ्यावर खूप प्रेम केल्याबद्दल माझ्या चाहत्यांचे आभार. लव्ह यू कपिल शर्मा, अर्चना पूरण सिंग, किकू शारदा, सुमोना चक्रवर्ती. परत आल्यावर खूप आनंद झाला. विलक्षण मजेदार वीकेंड.” अशा प्रकारे कृष्णा अभिशेकने आपला आनंद व्यक्त केला आहे. (tv comedian krushna abhishek rejects sajid khan film for the kapil sharma show know here is why)

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
BIRTH ANNIVERSARY | हेल्दी लाईफ स्टाईल फॉलो करायचे मन्ना डे, रिमिक्स गाण्यांना कधीच दिला नाही प्रतिसाद

‘लालसिंग चड्ढा फार चांगला सिनेमा नव्हता’ म्हणत अनुपम खेर यांनी बॉयकॉट बॉलिवूडवर केले भाष्य

हे देखील वाचा