असे काय झाले ‘डान्स दीवाने’च्या सेटवर की, सर्वांना हसवणारी भारती सिंग सोनू सूद समोर लागली ढसा ढसा रडू

भारती सिंग डान्स दिवानेच्या सेटवर असा काही बोलून गेली की, नोरा फतेहीपण लागली रडू


देशात कोरोना व्हायरसने कहर केला आहे. कोरोना रूग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अशा परिस्थितीत अभिनेता सोनू सुद हा आधीपासूनच अनेकांसाठी देवाच्या रूपात धावून आला होता. आज देखील तो अशा महामारीत गरजूंची मदत करत आहे. सोनू लवकरचं ‘डान्स दीवाने ३’च्या सेटवर उपस्थित राहणार आहे. विनोदांची राणी भारती सिंग बर्‍याचदा विनोदी आणि धमाकेदार शैलीने कोणालाही हसण्यास भाग पाडत असते.

पण शनिवारी (१ मे) कलर्स टीव्हीवरील ‘डान्स दिवाने’ या डान्स रियॅलिटी शोच्या सेटवर असे काहीतरी घडले की, भारती स्वत: ला रडण्यापासून रोखू शकली नाही. या एपिसोडचे अनेक प्रोमो सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आले आहेत. त्यामधील भारती सिंगचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

शनिवारी सोनू सूद ‘डान्स दिवाने’ च्या सेटवर खास पाहुणा म्हणून दाखल झाला होता. महामारीच्या या काळात सोनू सूदने हजारो लोकांना मदत केली आहे. लॉकडाऊनमध्ये अनेक कामगार, आणि लोकांना त्यांच्या घरी नेण्यापासून ते बेरोजगारांना नोकरी लावण्यापासून सोनू सूदने, आपल्या बाजूने लोकांना खूप मदत केली आहे. अशातच शनिवारच्या भागामध्ये कोरोना, आणि त्यातील वेदनादायक कथा या अनेक नृत्यामधून दाखवण्यात आल्या आहेत. एका नृत्य सादरीकरणाच्या माध्यमातून दाखविले गेले की, २ महिन्याच्या मुलाला कोरोना झाला, आणि त्याला वाचवता आले नाही.

या नृत्यानंतर भारती खूपच भावनिक झाली, आणि तिने आपल्या आईची कोरोनो, आणि त्यावेळी तिची प्रकृती कशी होती, याविषयी नमूद केले आहे. भारती म्हणाली, ‘आई फोन करायची, आणि रडायची की, समोरच्या काकांचा मृत्यू झाला आहे. मला भीती वाटत होती की, मला तर असा फोन येणार नाही ना.’ भारती स्टेजवर खूपच भावनिक झाली होती, आणि ती म्हणाली, ‘अशा लहान मुलांनाही कोरोना होतो हे मला माहितच नव्हते.’

भारती पुढे म्हणाली, ‘सोनू भाई, आम्ही गेल्या काही काळापासून, बाळासाठी योजना आखण्याचा विचार करत होतो. परंतु अशा गोष्टींचा विचार करून मनच होत नाही की, आम्ही आपापसात बोलले पाहिजे. कारण मला असे रडायचे नाही आहे. मी खूप सामर्थ्यवान आहे, मी सर्वांना हसवत राहते, परंतु मी येवढीही खंबीर नाही की, हे दुःख सहन करू शकेल. माझी हिम्मतच होत नाही की, मी बाळाच्या योजनेबद्दल हर्षसोबत बोलावे.’ भारतीची ही अवस्था पाहून नोरा फतेहीपण रडू लागली. सोबतच सोनूचेही डोळे पाणावले.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-कोरोना रुग्णांच्या मदतीसाठी पुढे आले मिलिंद सोमण; प्लाझ्मा दान करण्यासाठी करतायत जोरदार व्यायाम, पाहा व्हिडिओ

-खरंच! ‘मी दिशाला किस केले नाही’, असं का म्हणाला सलमान खान? पाहा बिहाईंड द सीन्स व्हिडिओ

-कोव्हिड पॉझिटिव्ह अभिनेता अनिरुद्ध दवेची प्रकृती गंभीर; पत्नीने फोटो शेअर केली भावुक पोस्ट, वाचून तुमचेही डोळे पाणावतील


Leave A Reply

Your email address will not be published.