Thursday, January 22, 2026
Home बॉलीवूड शाहरुखसोबत काम करणाऱ्या ‘या’ अभिनेत्रीने उरकला साखरपुडा, 26व्या वयात बनणार नवरी

शाहरुखसोबत काम करणाऱ्या ‘या’ अभिनेत्रीने उरकला साखरपुडा, 26व्या वयात बनणार नवरी

सन 2022 संपून आता एक आठवडा लोटला आहे. अनेक कलाकार 2023मध्ये लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत. यामध्ये शाहरुख खान, प्रीति झिंटा आणि सैफ अली खान यांच्या ‘कल हो ना हो’ या सिनेमात झळकलेली बालकलाकार आता लग्नबंधनात अडकण्यासाठी सज्ज झाली आहे. 2003मध्ये आलेल्या या सिनेमात अभिनेत्री झनक शुक्ला हिने ‘जिया कपूर’ हे पात्र साकारले होते. जिया आता 26 वर्षांची झाली आहे. या सर्वांमध्ये आता तिच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित बातमी समोर येत आहे.

माध्यमांतील वृत्तांनुसार, टीव्ही इंडस्ट्रीला रामराम ठोकणाऱ्या झलक शुक्ला (Jhanak Shukla) ही लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. ती बॉयफ्रेंड स्वप्नील सूर्यवंशी (Swapnil Suryavanshi) याच्यासोबत संसार थाटणार आहे. याबाबत झनकने स्वत: तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर तिच्या साखरपुड्याचे फोटो शेअर करत याबाबत हिंट दिली आहे.

झनक शुक्ला इंस्टाग्राम
अभिनेत्री झनक शुक्ला हिने इंस्टाग्रामवर फोटो शेअर केले आहेत. यामध्ये ती कुटुंबासोबत दिसत आहे. दुसऱ्या फोटोत ती होणारा नवरा स्वप्नीलसोबत पोझ देताना दिसत आहे. झनकच्या साखरपुड्याचे फोटो समोर येताच, ते सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाले आहेत. टीव्ही कलाकारांपासून ते चाहत्यांपर्यंत अनेकजण तिला शुभेच्छा देत कमेंट्सचा पाऊस पाडत आहेत.

‘करिश्मा का करिश्मा’मधून मिळाली ओळख
अभिनेत्री झनक शुक्लाने सर्वप्रथम बालकलाकार म्हणून ‘करिश्मा का करिश्मा’ या टीव्ही मालिकेतून प्रसिद्ध झाली होती. यानंतर तिने ‘सोन परी’ आणि ‘हातिम’ या शोमध्ये काम केले. टीव्हीसोबतच ती अनेक सिनेमांचाही भागही राहिली आहे. विशेष म्हणजे, ती ‘वन नाईट विथ द किंग’ आणि ‘डेडलाईन: सिर्फ 24 घंटे’ या हॉलिवूड सिनेमातही दिसली आहे. मात्र, दीर्घ काळानंतर तिने शिक्षणासाठी सिनेमे आणि टीव्ही मालिकांमधून विश्रांती घेतली होती. त्यानंतर ती परत पडद्यावर दिसली नाही. tv kal ho na ho child actress jhanak shukla gets engaged to her beau swapnil suryawanshi read more

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
सिद्धार्थ आणि कियारा यांच्या लग्नावर ‘या’ तिसऱ्याच व्यक्तीने केले शिक्कामोर्तब?, व्हिडिओ वायरल
‘तु वेडी आहेस का?’ सारा अली खानच्या जोकवर भडकला रितेश देखमुख,पाहा व्हायरल व्हिडिओ

हे देखील वाचा