‘कल हो ना हो’मधील शाहरुखची छोटी मैत्रीण झालीय खूपच मोठी, तुमचाही डोळ्यांवर बसणार नाही विश्वास


सध्या सोशल मीडियावर हिंदी चित्रपटसृष्टीत बालकलाकार म्हणून काम करणाऱ्या अभिनेते- अभिनेत्रींचे फोटो सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत. काही कलाकारांचे फोटो हे लगेच ओळखता येतात, तर काहींचे फोटो हे ओळखताना नाकी नऊ येतात. मात्र, आपण जेव्हा याच कलाकारांचे जुने आणि नवीन फोटो पाहतो, तेव्हा नक्कीच हैराण होतो. कारण त्यांच्यात तेवढा बदल झालेला असतो. अशातच आता ‘कल हो ना हो’ चित्रपटातील एका बालकलाकाराचा फोटो व्हायरल होत आहे.

या चित्रपटात ती अभिनेत्री प्रीति झिंटाची (Preity Zinta) छोटी बहीण तसेच, शाहरुख खानची (Shahrukh Khan) सर्वात छोटी मैत्रीण होती. तिने जिया कपूरची (Gia Kapoor) भूमिका साकारली होती. तिने आपल्या या भूमिकेने लाखो चाहत्यांच्या मनात घर केले होते. ती अभिनेत्री इतर कुणी नसून झनक शुक्ला (Jhanak Shukla) आहे.

फोटो होतायत व्हायरल
नुकतेच जिया म्हणजेच ​​झनक शुक्लाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. हे फोटो पाहून चाहत्यांना विश्वास बसणार नाही की, ही तीच लहान गोंडस मुलगी आहे, जी चित्रपटात शाहरुखसोबत खूप मस्ती करताना दिसली होती. व्हायरल होत असलेल्या या फोटोंमध्ये ती कधी-कधी डोंगर दऱ्यांचा आनंद लुटताना, तर कधी मस्ती करताना दिसत आहे.

अनेक प्रोजेक्ट्समध्ये केले आहे काम
विशेष म्हणजे, झनक शुक्लाची आई सुप्रिया शुक्ला देखील एक प्रसिद्ध कलाकार आहेत. त्या अनेक टीव्ही मालिकांमध्ये महत्त्वाच्या भूमिकेत दिसल्या आहेत. झनकचे वडीलदेखील चित्रपट निर्माते आहेत.

झनकबद्दल सांगायचे झाले, तर ‘कल हो ना हो’मध्ये तिने उत्तम काम केले आहे. यासोबतच ती ‘डेडलाईन’ या चित्रपटातही दिसली होती. चित्रपटाव्यतिरिक्त, ती टीव्हीवरील सर्वात लोकप्रिय शो ‘करिश्मा का करिश्मा’मध्ये देखील दिसली होती, या मालिकेने तिने सर्व प्रेक्षकांच्या मनात खास स्थान निर्माण केले होते.

हेही वाचा-


Latest Post

error: Content is protected !!