Tuesday, May 21, 2024

‘मला जगू द्या…’, स्वत:शीच संसार थाटणाऱ्या अभिनेत्रीने काही महिन्यातच नांग्या टाकत मागितली माफी

‘देवी आदि पराशक्ती’, ‘पवित्र रिश्ता’ यासारख्या दमदार मालिकांमध्ये आपल्या अभिनयाची छाप साेडणारी कनिष्का सोनी हिने काही महिन्यांपूर्वी इंस्टाग्रामवर सिंदूर आणि मंगळसूत्र घातलेले फोटो शेअर करून चाहत्यांना आश्चर्यचकित केले होते. ज्यामुळे ती प्रचंड चर्चेत आली हाेती. खरं तर, तेव्हा अभिनेत्री लग्न आणि स्वतःवर प्रेम करण्याबद्दल बोलली होती.

कनिष्टा साेनी (kanishka soni) हिने सांगितले होते की, “तिला तिचे आयुष्य जगण्यासाठी कोणत्याही पुरुषाची गरज नाही. अभिनेत्रीच्या या गोष्टींनी सर्वांनाच आश्चर्य वाटले. अभिनेत्रीच्या बोलण्यावर लोकांचा विश्वास बसत नव्हता. प्रसिद्धी मिळवण्यासाठी तिने हे सर्व नाटक केल्याचे अनेकांना वाटले आणि तिच्यावर बरीच टीकाही झाली. त्यानंतर अभिनेत्रीने तिच्या स्पष्टीकरणात एक व्हिडिओ पोस्ट केला, ज्यामध्ये तिने स्व-विवाहाचा निर्णय घेण्याचे कारण स्पष्ट केले.

कनिष्का सोनी लोकांच्या प्रश्नांनी झाली त्रस्त
लग्नात प्रेम आणि प्रामाणिकपणा महत्त्वाचा असल्याचं अभिनेत्रीने म्हटलं होतं, पण आता तिचा यावर विश्वास नाही, त्यामुळे तिने एकटे राहणेच योग्य मानले. तिने बाहेरच्या जगात प्रेम शोधण्याऐवजी स्वतःवर प्रेम करण्याला महत्त्व दिले. असे असतानाही लोक अभिनेत्रीला विविध प्रश्न विचारू लागले. कनिष्क लोकांच्या प्रश्नांना कंटाळल्याचं दिसतंय, त्यामुळे तिने नव्या पोस्टमध्ये लोकांची माफी मागितली आहे आणि सगळं विसरून जाण्याची विनंती केली आहे.

कनिष्काने सांगितल स्वतःला एक निष्पाप आणि भावनिक व्यक्ती
कनिष्काने इंस्टाग्रामवर एक नोट शेअर केली आहे, ज्यात लिहिले आहे की, “मी एका साध्या आणि परंपरावादी कुटुंबातील आहे. चित्रपटसृष्टीत येण्यापूर्वी मी लिव्ह-इन रिलेशनशिपबद्दल ऐकले नव्हते. मला चित्रपटाची पार्श्वभूमी नाही. माझ्या भोळेपणामुळे आणि भावनिक स्वभावामुळे मी इंडस्ट्रीत अनेक वाईट गोष्टी सहन केल्या आहेत.”

कनिष्काने मागितली लोकांची माफी
कनिष्काने पुढे माफी मागितली, “मला माफ करा. मला शांततेत जगू द्या माझी गोष्ट जगाला सांगून मी कंटाळले आहे. एका मुलाखतीत मी स्वत:च्या लग्नानंतरच्या माझ्या आयुष्याबद्दल खुलेपणाने बोलले. मी मनापासून सर्व काही सांगितले आहे. मी प्रसिद्धी  मिळवण्यासाठी काहीही केलेले नाही. कर्मावर विश्वास ठेवा.”

अभिनेत्री कनिष्का टीव्ही शो ‘दिया और बाती हम’ मधून प्रसिद्ध झाली होती. (tv kanishka soni apologized few months after self marriage said let me live an)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक कर
हेही वाचा-
दिया मिर्झाचा सिंपल ग्लॅमरस लूक चाहत्यांना करतोय घायाळ, पाहा फाेटाे गॅलेरी

‘मेरी कहानी श्रद्धा वॉकर जैसी’, ‘या’ अभिनेत्रीनं लिव्ह इन रिलेशनशिपवर केला धक्कादायक खुलासा

हे देखील वाचा