×

Video: स्पर्धकाने आपल्या जादूने शिल्पाला लटकवलं हवेत; पाहण्यासारखं होतं अभिनेत्रीचं तोंड

टीव्हीवरील रियॅलिटी शोमध्ये कधी काय दाखवलं जाईल याचा नेम नाही. असाच एक रियॅलिटी शो आहे, तो म्हणजे ‘इंडियाज गॉट टॅलेंट‘ होय. या शोमध्ये परीक्षक शिल्पा शेट्टी, किरण खेर, बादशाह आणि मनोज मुंतशीर हे दिग्गज आहेत. या शोमध्ये देशभरातील वेगवेगळ्या ठिकाणांहून भन्नाट स्पर्धक भाग घेण्यासाठी येत आहेत. त्यांची प्रतिभा पाहून चारही परीक्षकांच्याही भुवया उंचावतात. शोमध्ये एका जादूगरानेही आपली मॅजिक दाखवली आहे. मात्र, आता आगामी एपिसोडमध्ये एक असा जादूगार पाहायला मिळणार आहे, ज्याने शिल्पा शेट्टीला हवेत लटकवले आहे. यादरम्यानचा व्हिडिओ खुद्द शिल्पानेच तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला आहे. ज्यात अभिनेत्री हवेत कोणत्याही आधाराशिवाय लटकलेली दिसत आहे.

निर्मात्यांनी या एपिसोडचा एक प्रोमो व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. तोच व्हिडिओ शिल्पानेही तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर पुन्हा शेअर केला आहे. या व्हिडिओत दिसते की, शिल्पा (Shilpa Shetty) पहिल्यांदा एका छोट्या टेबलावर उभी असते. यादरम्यान, स्पर्धकाने अभिनेत्रीच्या हातात चांदीची रॉड धरली आहे, पण त्यानंतर शिल्पाचे डोळे बंद करण्यास सांगितले जाते. यानंतर स्पर्धक तिच्या पायाखालून टेबल काढतो. यादरम्यान शिल्पाला काहीही होत नाही. ती अजूनही हवेत उभी असते.

शिल्पाच्या हातातून रॉडही घेतल्याचे व्हिडिओमध्ये पुढे दिसत आहे. यानंतरही ती हवेत उभी असते. या व्हिडिओमध्ये शिल्पा कोणत्याही आधाराशिवाय काही सेकंद हवेत उभी असल्याचे दिसत आहे. हा प्रकार पाहून तिथे उपस्थित असलेले सर्वजण आश्चर्यचकित होतात. ते पाहून मनोज मुंतशीर म्हणतात, “आता हे काय?” हे पाहून इतरांनी टाळ्यांचा पाऊसही पाडला. एवढेच नाही, तर शिल्पाही भारावून गेली. व्हिडिओमध्ये अभिनेत्रीचा चेहरा पाहण्यासारखा आहे.

View this post on Instagram

A post shared by Shilpa Shetty Kundra (@theshilpashetty)

हा व्हिडिओ शेअर करत शिल्पाने लिहिले की, ‘हे होतं अविश्वसनीय रेड्डी. शेट्टी.’ शिल्पाच्या या व्हिडिओला आतापर्यंत १२ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तसेच १ लाखांहून अधिक लाईक्सचाही पाऊस पडला आहे.

हा भाग या वीकेंडला म्हणजेच २० फेब्रुवारीला प्रसारित होणार आहे. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर आता चाहते नक्कीच या एपिसोडची वाट पाहत आहेत.

हेही वाचा-

Latest Post