‘ससुराल सिमर का’ फेम अभिनेत्री वैशाली टक्कर हिचा गेल्या महिन्यातच रोका झाला होता. यावर्षी जूनमध्ये डॉ. अभिनंदन सिंग हुंदलशी लग्न करून ती युगांडाला जाण्याची अपेक्षा होती. मात्र, आता वैशालीचे लग्न पुढच्या वर्षीपर्यंत ढकलण्यात आले आहे. या अभिनेत्रीने आता कोरोना संकटातील गरजूंना मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. वैशाली रस्त्यावरील लोकांना अन्न आणि वैद्यकीय मदत करत आहे.
माध्यमांतील वृत्तांनुसार अभिनेत्रीने सांगितले की, साथीच्या आजारात गरजूंना आवश्यक सुविधा पुरविणाऱ्या एका विद्यार्थ्यांच्या गटामध्ये सहभागी होऊन ती लोकांना मदत करत आहेत. ती म्हणते की, ‘ज्या काळात कोरोनामुळे लोक मरत आहेत आणि अस्वस्थ आहेत, त्यावेळी ती कोणतेही सण, लग्न आणि भारत सोडून जाण्याचा विचार करू शकत नाही.’
अभिनेत्री पुढे म्हणाली, ‘सध्याची परिस्थिती पाहता, मी माझे लग्न पुढे ढकलले आहे. अशा वातावरणात मी सेलिब्रेशन कशी करू शकते, जेव्हा लोक दररोज मरत आहेत, अस्वस्थ आहेत. यावर्षी नवीन जीवन सुरू करण्याचे, माझे मन नाही आहे. यावर्षी माझे लग्न होणार नाही. जर पुढच्या वर्षी गोष्टी चांगल्या झाल्या, तर मी लग्न करेल. जर सर्व काही व्यवस्थित झाले, तर आम्ही पुढच्या वर्षी लग्न करू. सध्या भारत सर्वाधिक संकटात अडकला आहे, आणि मी मौजमज्जा, लग्न किंवा देशाबाहेर जाण्याच्या मन: स्थितीत नाही. माझ्या देशात जेव्हा आजूबाजूचे लोक पीडित आहेत, आणि मरत आहेत, तेव्हा हे पाऊल उचलणे मला योग्य वाटत नाही.’
या संकटाच्या वेळी अभिनेत्री लोकांना मदत करत आहे. याविषयी ती विस्तृतपणे सांगते, ‘मी कोरोनाशी संबंधित, निराशाजनक बातम्या ऐकत आहे, वाचत आहे आणि पाहत आहे, ज्यामुळे दररोज बर्याच लोकांना त्याचा त्रास होत आहे. लोक रस्त्यावर उपाशीपोटी मरत आहेत, कारण त्यांच्याकडे खायला अन्न नाही आहे. ऑक्सिजन, औषधे, प्लाझ्मा आणि वैद्यकीय मदतीच्या कमतरतेमुळे, लोक इस्पितळात मरत आहेत. मी अलीकडेच इंदूरच्या ‘स्टुडंट्स हेल्पिंग हॅन्ड्स’ च्या टीममध्ये सामील झाले आहे. जो लोकांचा हा एक छोटासा गट आहे, जे रस्त्यावर लोकांसाठी, अन्न पुरवणाचे काम करत आहेत. ते लोकांना रक्त, प्लाझ्मा, औषधे, ऑक्सिजन सिलिंडर आणि इतर वैद्यकीय मदत मिळविण्यास मदत करत आहेत. ते अशा मुलांना मदत करत आहेत, जे फी भरु शकत नाहीत, किंवा त्यांच्याकडे जेवण किंवा कपडे नाहीत. मला स्वस्थ बसायचे नव्हते.’
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-राधे चित्रपटातील किसींग सीनबाबत दिशा पटानीचा मोठा खुलासा, म्हणाली…










