Friday, December 27, 2024
[aioseo_breadcrumbs]

राज कुंद्रा असणार बिग बॉस १६ चा भाग? मोठी माहिती आली समोर

सद्या टीव्ही शो मध्ये बिग बॉस 16 या कार्यक्रमाच्या चर्चा सुरु आहेत. रियालीटी शोमध्ये सगळ्यात जास्त प्रसिद्ध असणारा कार्यक्रम बिग बॉस 16 हा लवकरच चाहत्यांच्या भेटीसाठी येणार आहे. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सलमान खान करत असतो. या कार्यक्रमामध्ये दरवर्षी प्रमाणे यावर्षीही नामांकित कलाकार भाग घेणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. हळूहळू यावर्षी भाग घेणाऱ्या सेलिब्रिटीचे नाव पुढे येत आहेत या लिस्टमध्ये शिल्पा शेट्टीचे (shilpa shetty) पती राज कुंद्रा यांचेही नाव समोर आले आहे. जाणून घेउया पूर्ण माहिती.

बिग बॉस हा सगळ्यात जास्त फेमस आण़ि चाहत्यांच्या आवडीचा कार्यक्रम आहे, यामध्ये येणाऱ्या सेलिब्रीटीचे नावे इंटरनेटवर व्हायरल होत आहेत. यामध्ये सगळ्यांचे लक्ष वेधनारे नाव म्हणजे शिल्पा शेट्टी(Shilpa Shetty) चे पती राज कुंद्रा(Raj Kundra) हा देखील बिग बॉस 16 चा ए्क भाग होणर असल्याच्या चर्चा सुरु आहेत.

अफवानुसार बोलले जात आहे की, बिग बॉस 16 चे दिग्दर्शकांनी व्यवसायिक राज कुंद्राला बिग बॉस 16 चा भाग बनण्यासाठी फोन आला होता. कारण काही दिवसापूर्वी जुलै 2021 मध्ये राज कुंद्राला अश्र्लील व्हिडीओ बनवण्यामुळे पोलसांनी पकडले होते. यामुळे त्याचे नाव खूपच बदनाम झाले आहे त्यामुळे तो बाहेर जात असताना नेहमी आपल्या चेहऱ्यावर मास्क लावून बाहेर जात असतो

त्याने या केसमधुन सप्टेंबरमध्ये जामिन मिळवला आहे त्याला वाटत आहे की त्याला केणीतरी फसवत आहे त्याचा आणि अश्र्लील व्हीडीओचा काहीच संबंध नाही. कादाचित राज कुंद्रा आपली बाजू सगळ्यापर्यत पोहाचवण्यासाठी या कार्यक्रमाचा भाग होऊ शकतो. त्याला आपले पक्ष मांडण्यासाठी बिग बॉस सारखा कार्याक्रम मिळत आहे. मात्र राज कुंद्रा हा आणखी विचार करत आहे त्याने आणखी काहीच सांगितले नाही. बिग बॉस हा कार्यक्रम 1 ऑक्टोबरपर्यत चाहत्यांच्या भेटीला येणार आहे.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा
‘या’ कारणामुळे कॅटरिना कैफला विकी कौशल वाटलेला बेस्ट हसबंड, स्वतः केला खुलासा
हिमेशच्या ‘त्या’ एका वक्तव्याने दुखावल्या होत्या आशाजी, दिली होती चापट मारण्याची धमकी
पहिल्या दिवशी बक्कळ पैसा छापल्यानंतर दुसऱ्याच दिवशी आपटले ‘हे’ सिनेमे, ‘ब्रह्मास्त्र’चं काय होणार?

 

हे देखील वाचा