हिमेशच्या ‘त्या’ एका वक्तव्याने दुखावल्या होत्या आशाजी, दिली होती चापट मारण्याची धमकी


हिंदी चित्रपटसृष्टीतील महान गायिका आशा भोसले यांच्याबद्दल कोणताही परिचय द्यायची गरज नाही. किशोर कुमारांप्रमाणेच, त्यांना निर्विवादपणे बॉलिवूडमधील सर्वात ‘वर्सेटाइल सिंगर’ मानले जाते. मग ते रोमँटिक गाणी असोत किंवा दर्दभरे, गझल असो वा वेस्टर्न टच गाणी. प्रत्येक गाण्याला ‘आशा ताई’ त्यांच्या मधुर आवाजाने जिवंत करत असतात. त्यांच्या वर्सेटाइलिटीमुळे आरडी बर्मन आणि ओपी नय्यर यांच्यासारख्या संगीतकारांची त्या पहिली पसंती बनल्या होत्या.

त्याचबरोबर हिमेश रेशमिया हिंदी चित्रपटातील अष्टपैलू व्यक्तीमत्त्व म्हणून प्रसिद्ध आहे, ज्याने त्याच्या गाण्यांनी चाहत्यांना अक्षरशः वेड लावले. हिमेश रेशमिया हिंदी चित्रपटांचा एक सुप्रसिद्ध संगीतकार आहे. हिमेश रेशमिया एक चांगल्या संगीतकारासोबत, चित्रपट अभिनेता आणि निर्माता देखील आहे.

असे म्हणतात की, एकदा आरडी बर्मन यांच्याबद्दल रेशमियाने अशी कमेंट केली होती, जी कोणालाच आवडली नाही. हिमेशने बर्मनसाठी केलेल्या अशा कमेंट्स आशा भोसले यांनाही आवडल्या नाहीत. अशा परिस्थितीत, त्यांनी हिमेशला चापट मारण्याची धमकीही दिली होती. यानंतर आशाजींच्या नाराजीनंतर हिमेशला त्याची चूक लक्षात आली आणि त्याने त्याचे वक्तव्य स्पष्ट करत माफी मागितली. मग काय? आशाजींनी हिमेशच्या चुकिला माफ केले.

आशा भोसले यांची मोठी बहीण लता मंगेशकर यांना ‘गान कोकिळा’ म्हटले जाते, तर 10 हजारपेक्षा अधिक गाणी गाणाऱ्या आशा जी यांना बहुमुखी प्रतिभा असलेली गायिका मानले जाते. हिंदी चित्रपटांच्या दृष्टीने मैलाचा दगड म्हणून मानली जाऊ शकणारी अशी अनेक गाणी आशाजींनी गायली आहेत.

हिमेश रेशमियाने 2007 मध्ये ‘आपका सुरूर’ या चित्रपटाद्वारे अभिनयाचा प्रवास सुरू केला होता. हिमेश हिंदी सिनेमाचा पहिला असा गायक आणि संगीत दिग्दर्शक आहे, ज्याला त्याच्या पहिल्याच गाण्यासाठी ‘फिल्मफेअर बेस्ट डेब्यू सिंगर अवॉर्ड’ मिळाला होता. यानंतर त्याने ‘कर्ज’, ‘रेडिओ’, ‘खिलाडी 786’, ‘एक्सपोज’, ‘तेरा सुरूर’, यांच्यासह अनेक चित्रपटांमध्येही काम केले, पण त्याला यश मिळाले नाही.


Leave A Reply

Your email address will not be published.