Thursday, April 17, 2025
Home बॉलीवूड ट्विंकल खन्ना करत आहे ‘या’ आजाराचा सामना, पोस्ट शेअर करत स्वतः केला आजाराचा खुलासा

ट्विंकल खन्ना करत आहे ‘या’ आजाराचा सामना, पोस्ट शेअर करत स्वतः केला आजाराचा खुलासा

अभिनेत्री ट्विंकल खन्ना नेहमीच तिच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांना खुश ठेवत असते. तिच्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट ती चाहत्यांना सोबत शेअर करत असते. तिच्या सेन्स ऑफ ह्युमरने ती सगळ्यांना हसवत असते. अशातच तिने आणखी एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यात तिने तिच्या आजारपणाबाबत सांगितले आहे. ज्यामुळे अनेकवेळा तिला अडचणींना सामोरे जावे लागले आहे. तिच्या आयुष्यातील काही गोष्टी तिने तिच्या चाहत्यांसोबत शेअर केल्या आहेत.

ट्विंकल खन्ना सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असणारी अभिनेत्री आहे. तिच्या मनातील अनेक गोष्टी ती सोशल मीडियावर शेअर करत असते. तिने इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. ती टेप घेऊन काहीतरी मोजताना दिसत आहे. आणि सांगितले की, कसे बोलण्याआधी विचारकरण्या आधी ती अडचणीत सापडली. (Twinkle khanna share a photo on Instagram and tell about her habit)

तिने हा फोटो शेअर करून लिहिले की, “ते म्हणतात की, दोन वेळा माप घ्यायचं आणि एकदा कपायचं. मी असे करते जेव्हा मी लिहीत असते. पण मला असे वाटते जेव्हा मी बोलून दाखवते, तेव्हा मला ते करता देखील आले पाहिजे. नेहमीप्रमाणे मी अडचणीत आहे. विचार न करता बोलण्याचा आजापणामुळे मी अडचणीत सापडते जे खूप लाजिरवाणा आहे.”

तिची ही पोस्ट सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. अनेकजण तिच्या पोस्टवर कमेंट करत आहेत. त्यामुळे तिने शेअर केलेला हा फोटो सध्या जोरदार चर्चेत आहे.

हेही वाचा :

हे देखील वाचा