×

पारदर्शी ड्रेसमध्ये बोल्ड फोटोशूट करत कियाराने लावली सोशल मीडियावर आग

खूप कमी कालावधीत बॉलिवूडमध्ये स्वतःचे अस्तित्व निर्माण करत अमाप लोकप्रियता मिळवणारी अभिनेत्री म्हणजे कियारा अडवाणी (Kiara Advani). कियाराने फ्लॉप चित्रपटापासून तिच्या कारकिर्दीची सुरुवात केली असली तरी आज तिची गणना बॉलिवूडमधील टॉपच्या अभिनेत्रींमध्ये होते. धोनी, कबीरसिंग, गुड न्यूज, लस्ट स्टोरी आदी चित्रपट, वेबसिरीजमधील तिची भूमिका तुफान गाजली. कियारा तिच्या वैयक्तिक आयुष्यात खूपच ग्लॅमरस आणि बोल्ड आहे. ती नेहमी तिचे बोल्ड फोटो सोशल मीडियावरून शेअर करत इंटरनेटचे तापमान वाढवत असते. नुकतेच तिने तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले असून, या फोटोंमुळे ती चांगलीच लाइमलाईट्मधे आली आहे.

View this post on Instagram

A post shared by KIARA (@kiaraaliaadvani)

कियारा अडवाणीने शेअर केलेल्या फोटोंमध्ये तिने ग्रे आणि गोल्डन रंगाचे कॉम्बिनेशन असलेला पारदर्शी ड्रेस घातला असून, यात ती कमालीची सुंदर दिसत आहे. या ड्रेसवर तिने खूपच लाईट मेकअप केला असून, त्यावर तिने तिचे केस बांधले आहे. तिचे हे फोटो पाहून फॅन्स घायाळ होत आहे. या ड्रेसमध्ये तिने कमालीच्या पोझ देत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. हे फोटोशूट तिने एका मासिकासाठी केले असून, यात ती कमालीची हॉट दिसत आहे.

View this post on Instagram

A post shared by bollywoodpep (@bollywoodpep)

याआधी देखील कियारा अडवाणीने बॅकलेस गाऊन घातला असून, त्यावरचे तिचे फोटो देखील खूपच व्हायरल झाले होते. या लूकमध्ये तिने तिची बॅक साईड फ्लॉन्ट केली होती. या लूकवरचा तिचा व्हिडिओ तुफान गाजला. कियारा मागील काही काळापासून शेरशहा सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर सिद्धार्थ मल्होत्रा (Sidharth Malhotra) सोबत असलेल्या नात्यामुळे सतत प्रकाशझोतात येत असते. दोघांना अनेकदा एकमेकांसोबत पाहिले जाते. मात्र अजूनही त्यांनी त्यांच्या नात्याला अधिकृतपणे स्वीकार केलेले नाही.

View this post on Instagram

A post shared by KIARA (@kiaraaliaadvani)

कियाराच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले तर, सध्या व्यस्त अभिनेत्रींपैकी एक अभिनेत्री म्हणून कियारा ओळखली जाते. लवकरच ती कार्तिक आर्यनसोबत ‘भूल भुलैया 2’ मध्ये दिसणार असून, वरूण धवनसोबत ती ‘जुग जुग जियो’ आणि विकी कौशलसोबत ‘गोविंदा नाम मेरा’ मध्ये दिसणार आहे.

हेही वाचा :

Latest Post