Thursday, April 18, 2024

‘कॅपेचिनो फॉर प्रिया’ घराचा कॅफे केलेल्या बायकोबद्दल उमेश कामतने व्हिडिओ पोस्ट करत केली तिची तक्रार

मराठी मनोरंजनविश्वातील सर्वात जास्त लोकप्रिय, ग्लॅमरस आणि प्रसिद्ध जोडीपैकी एक जोडी म्हणजे प्रिया बापट आणि उमेश कामत. या दोघांचे अमाप फॅन्स आहेत. दोघांची रियल आणि रील जोडी नेहमीच प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेते. सोशल मीडियावरही त्यांची जोडी हिट आहे. त्यांचे अनेक व्हिडिओ, रील खूपच व्हायरल होतात आणि त्यांना लाइमलाइट मिळवून देतात. प्रिया आणि उमेश सोशल मीडियावर देखील कमालीचे सक्रिय आहे. ते नेहमीच काही ना काही पोस्ट शेअर करतच असतात. काही दिवसांपूर्वीच त्यांचा काश्मीरमध्ये फिरायला गेल्यानंतर तिथला भाजी मार्केट बघण्याच्या अनुभवाचा एक व्हिडिओ तुफान व्हायरल झाला होता.

 

View this post on Instagram

 

A post shared by Umesh Kamat (@umesh.kamat)

आता पुन्हा एकदा प्रिया आणि उमेशची जोडी एका व्हिडिओमुळेच चर्चेत आली आहे. या व्हिडिओमध्ये तर उमेशने सार्वजनिकरित्या प्रियाची तक्रार करत त्याला तिच्यात खटकणारी गोष्ट सांगितली आहे. उमेशने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तो प्रियासाठी कोफी बनवताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये दिसते की, उमेश कॉफी तयार करतो आणि प्रियाला आवाज देत म्हणतो, ‘प्रिया कॉफी तयार आहे.’ मात्र यावर प्रिया काहीच उत्तर देत नाही, यानंतर तो पुन्हा तिला जोरात आवाज देतो मात्र ती काहीच उत्तर देत नाही. त्यानंतर वैतागलेला उमेश कॅफेमध्ये दिल्या जाणाऱ्या आवाजात प्रियाला हाक मारतो. तो म्हणतो, ‘कॅपेचिनो फॉर प्रिया…’ हे ऐकताच दुसऱ्या सेकंदाला प्रिया म्हणते.. आले…’. यानंतर उमेशचे एक्सप्रेशन पाहून तुम्हाला देखील हसू आवरता येणार नाही.

हा मजेशीर व्हिडिओ शेअर करताना उमेशने त्याला कॅप्शन देखील मजेशीर दिले आहे. त्याने लिहिले, “घराचा cafe केलाय बाईंनी, माझ्या बायकोला आवडते माझ्या हातची कॉफी हीच मला मिळालेली खरी ट्रॉफी.” त्याच्या या व्हिडिओवर कलाकारणसोबत नेटकाऱ्यानी देखील भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत. तुम्ही देखील हा व्हिडिओ नक्की पाहा.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-

‘खोटी कारणं नका देऊ’ रेस्टोरंटमध्ये ‘या’ कारणासाठी प्रवेश नकारल्यानंतर संतापलेल्या उर्फीने शेअर केली पोस्ट

प्रसिद्ध सेलिब्रिटी सारखे दिसण्याच्या नादान गमावला जीव, कॉस्मेटिक सर्जरीमुळे ‘या’ अभिनेत्याचा दुर्दैवी अंत

हे देखील वाचा