अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळींच्या नातीने वेधले सर्वांचे लक्ष; अभिनेता अक्षय वाघमारेने फोटो केले शेअर

सोशल मीडियावर नेहमीच कलाकार सोशल मीडियावर त्यांच्या लहान मुलांचे फोटो शेअर करत असतात. अशातच एका लहान मुलीची सोशल मीडियावर सध्या जोरदार चर्चा चालू आहे. अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी यांच्या नातीचे फोटो सध्या जोरदार व्हायरल होत आहे. अभिनेता अक्षय वाघमारे आणि योगिता गवळी यांच्या मुलीचे फोटो सध्या चर्चेत आहेत. योगिता गवळी ही अरुण गवळी यांची मुलगी आहे. अक्षय आणि योगिता यांनी गेल्या वर्षी मे महिन्यात लग्न केले होते. या वर्षी ७ मेला त्यांनी एका मुलीला जन्म दिला आहे. अशातच अरुण गवळी म्हणजेच डॅडींसोबत तिचे फोटो व्हायरल होत आहेत. अक्षयने आजोबा-नातीचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

अक्षय वाघमारेने त्याच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरून आजी-आजोबा आणि नातीचे काही फोटो शेअर केले आहेत. त्याने या आधी देखील डॅडींसोबत त्याच्या चिमुकलीचे फोटो शेअर केले होते. आता शेअर केलेल्या या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की, अरुण गवळी यांनी त्यांच्या नातीला मांडीवर घेतलेले आहे. ते तिच्याकडे बघून हसत आहेत. आपल्या लाडक्या नातीला भेटल्याचा वेगळाच आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसत आहे. (under world don arun gawali’s grand daughter’s photo viral on social media)

View this post on Instagram

A post shared by Akshay Waghmare (@akshayswaghmare)

अक्षयने शेअर केलेल्या या फोटोवर अनेकजण कमेंट करत आहेत. या फोटोवर योगिता गवळीने “आयुष्यभराची आठवण आणि अनुभव,” अशी कमेंट केली आहे. या फोटोमध्ये त्यांची मुलगी देखील खूप गोड दिसत आहे.

View this post on Instagram

A post shared by Akshay Waghmare (@akshayswaghmare)

अभिनेता अक्षय आणि योगिताने त्यांच्या मुलीचे नाव ‘अर्णा’ असे ठेवले आहे. अक्षयने यावर्षी १४ जूनला त्यांच्या मुलीचे नाव जाहीर केले होते. त्याने तो बाबा होणार आहे, ही गोष्ट देखील सोशल मीडियावर शेअर केली होती.

त्याने पोस्ट शेअर केली होती की, “मला इतका आनंद झाला आहे की, मी तो शब्दात मांडू शकत नाही. आमच्या लग्नाला वर्ष पूर्ण होणार असतानाच ही गोड बातमी मिळाली. त्यामुळे आमचा आनंद द्विगुणीत झाला आहे.” अशा शब्दात त्याने त्याच्या भावना व्यक्त केल्या होत्या. अक्षय आणि योगिताचा साखरपुडा सन २०१९ मध्ये झाला होता. त्यानंतर त्यांनी मे २०२० मध्ये लगीनगाठ बांधली होती.

अक्षयने आतापर्यंत ‘दोस्तीगिरी’, ‘फत्तेशिकस्त’, ‘युथ’, ‘बस स्टॉप’, ‘शिव्या’ यांसारख्या चित्रपटात काम केले आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-कोणासोबत राहतात अभिनेते दिलीप प्रभावळकर? जाणून घ्या ‘पछाडलेला’मधील इनामदार भुसनाळेच्या कुटूंबाबद्दल

-सिद्धार्थचा अंतिम प्रवास सुरू, लवकरच होणार पंचतत्वात विलीन

-‘मृत्यू हे आयुष्यातील सर्वात मोठे…’, मृत्यूनंतर सिद्धार्थ शुक्लाचे जुने ट्वीट व्हायरल

Latest Post