बॉलिवूडच्या ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रींनी विवाहित पुरुषांशी केले प्रेम, शेवटी राहिल्या अविवाहित; एकीने तर घेतलाय जगाचा निरोप


बॉलिवूड जगात अनेक कलाकार आहेत, ज्यांच्या प्रेमाच्या खूप चर्चा झाल्या आहेत. काही कलाकारांच्या जोड्या या आज खऱ्या आयुष्यातही आनंदाने सोबत राहत आहेत. पण बॉलिवूडच्या काही प्रसिद्ध अभिनेत्री प्रेमाअभावी अविवाहितच राहिल्या आहेत. आज आपण अशा काही प्रसिद्ध अभिनेत्रींविषयी जाणून घेणार आहोत की, ज्या अजूनही अविवाहितच आहेत, तर काहींनी या जगाचा कुमारिका म्हणूनच निरोप दिला आहे.

परवीन बाबी
बॉलिवूड अभिनेत्री परवीन बाबीचे नाव चाहत्यांच्या मनात अजूनही घर करून आहे. परवीन बाबींच्या काळात त्यांची बरीच प्रेमप्रकरणे गाजली होती. प्रत्येकवेळी त्यांचा कल विवाहित पुरुषांकडेच होता. विवाहित पुरुषांकडेच कल असलेल्या परवीन यांना सिनेजगात वेगवेगळ्या डोळ्यांनी पाहिले जात होते, कारण त्यांचे लग्न झालेल्या पुरुषांकडेच आकर्षण होते. डॅनी यांच्याशिवाय त्यांचे महेश भट्ट, आणि कबीर बेदी यांच्याशी जवळचे नाते होते. त्या प्रत्येकासमवेत लिव्ह-इनमध्ये राहिल्या होत्या, पण लग्न होऊ शकले नाही, आणि कुमारिका म्हणूनच या जगाला निरोप देऊन परवीन बाबी कायमच्या निघून गेल्या.

आशा पारेख
बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्री आशा पारेख प्रेमात तर पडल्या होत्या, पण यशस्वी होऊ शकल्या नाही. आशा या नासिर हुसेन यांच्या प्रेमात पडल्या होत्या. हे सत्य त्यांनी आपल्या आत्मचरित्रातही स्वीकारले आहे. आशा पारेख नेहमी म्हणायच्या की, नासिर हुसेन हे त्यांच्या आयुष्याचे खरे प्रेम आहे. त्यांच्यामुळे त्या कुमारीकाच राहिल्या.

नगमा
‘बागी’ चित्रपटाद्वारे आलेली नगमा अजूनही कुमारीच आहे. चित्रपटानंतर आता अभिनेत्री राजकारणाकडे वळली आहे. वयाच्या ४० व्या वर्षीही नगमा अद्याप कुमारिका आहे. एकेकाळी सौरव गांगुली यांच्याशी असलेल्या त्यांच्या प्रेमसंबंधाच्या बर्‍याच बातम्या आल्या होत्या.

सुष्मिता सेन
माजी मिस युनिव्हर्स आणि अभिनेत्री सुष्मिता सेन अजूनही कुमारी आहे. ती आपल्या दत्तक मुलींसोबत आनंदात राहते. आता ती आगामी काळात लग्न करते की, नाही याची सगळ्यांनाच उत्सुकता लागून राहिली आहे. विक्रम भट्ट, संजय दत्त, संजय कपूर यांच्यासह इतर अनेक विवाहित कलाकारांशी सुष्मिता सेनचे प्रेमसंबंध होते. आजकाल सुष्मिता रोहमन शॉलला डेट करत आहे. त्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर दिसत असतात.

शमिता शेट्टी
बॉलिवूड अभिनेत्री आणि शिल्पा शेट्टीची बहीण शमिता शेट्टी आतापर्यंत कुमारी आहे. शमिताचे प्रेम प्रथम विवाहित मनोज बाजपेयी यांच्यासोबत होते. यानंतर शमिताचे नाव हरमन बावेजा, आणि आफताब शिवदासानी यांच्याशीही जोडले गेले.

तब्बू
बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री तब्बूही कुमारी आहे. तब्बू ५० वर्षांची आहे, आणि ती अजूनही तेवढीच सुंदर दिसते. तब्बूचा साखरपुडा साजिद नाडियाडवाला यांच्याशी झाला असल्याचे सांगितले जात आहे. परंतु या वृत्ताचे सत्य कधीही समोर आले नाही. यानंतर तब्बूला दक्षिण सुपरस्टार नागार्जुन आवडले होते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-वैजयंती माला यांना नव्हते करायचे चित्रपटात काम, एका डान्स परफॉर्मन्सने बदलले आयुष्य

-प्रेमासाठी काहीही! प्रेम मिळवण्यासाठी ‘या’ कलाकारांनी चित्रपटात हद्दच केली पार, सुनील शेट्टीही यादीत सामील

-बॉलिवूडमधील ‘या’ प्रसिद्ध जोडप्यांना लग्नानंतर झाले नाही मूल, दिलीप कुमार अन् सायरा बानोचाही समावेश


Leave A Reply

Your email address will not be published.