Monday, June 9, 2025
Home बॉलीवूड काय सांगता! ‘जुदाई’ चित्रपटावेळी श्रीदेवी होत्या प्रेग्नेंट, सहअभिनेत्रीनेच केला खुलासा

काय सांगता! ‘जुदाई’ चित्रपटावेळी श्रीदेवी होत्या प्रेग्नेंट, सहअभिनेत्रीनेच केला खुलासा

सिने जगतातील अभिनेत्रींचे अनेक किस्से आणि माहित नसलेल्या गोष्टी नेहमीच ऐकायला मिळत असतात. कलाकारांच्या चाहत्यांनाही त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जाणून घेण्याची नेहमीच उत्सुकता लागलेली असते. लोकप्रिय अभिनेत्री उर्मिला मातोंडकरने असाच खुलासा दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी (Sridevi) यांच्याबद्दल केला आहे. सध्या अभिनेत्री उर्मिला मातोंडकर ‘डीआयडी सुपर मॉम्स’ या टीव्ही रिअलिटी शोमध्ये जजची भूमिका साकारत आहे, जिथे जान्हवी कपूर पाहुणी म्हणून दिसणार आहे. याच शोमध्ये जान्हवी कपूरसोबतच्या तिच्या नात्याबद्दल बोलताना उर्मिला मातोंडकरने श्रीदेवीशी संबंधित एक किस्सा शेअर केला आहे.

‘डीआयडी सुपर मॉम्स’ हा कार्यक्रम सध्या टेलिव्हिजनवर चांगलाच लोकप्रिय ठरताना दिसत आहे. कार्यक्रमाची परिक्षक उर्मिला मातोंडकर  मंचावर एका स्पर्धकाचा डान्स पाहून उर्मिला खूप आनंदी होते आणि नृत्यात तिच्या आईला साथ देणाऱ्या तिच्या मुलीचे तसेच तिच्या मुलीचे कौतुक करते. त्याचवेळी उर्मिलाला दिवंगत अभिनेत्री आणि जान्हवी कपूरची आई श्रीदेवीची आठवण येते आणि ती म्हणते की जान्हवीशी माझे खूप जुने आणि खास नाते आहे. आणि ती आईच्या पोटात असल्यापासून आहे.

स्पर्धकाचा डान्स पाहून उर्मिलाने सांगितले की, ‘जुदाई’च्या गाण्याच्या शूटिंगदरम्यान श्रीदेवी गर्भवती होती आणि तिच्या पोटात जान्हवी कपूर होती. मात्र, श्रीदेवीमुळे त्या गाण्याचे शूटिंग व्यवस्थित पूर्ण झाले. तेव्हापासून जान्हवीशी माझे खास नाते आहे. विशेष म्हणजे ‘जुदाई’ 1997 मध्ये रिलीज झाला होता. यामध्ये बॉलिवूड अभिनेता अनिल कपूर मुख्य भूमिकेत होता. त्याचवेळी त्याच्या विरुद्ध श्रीदेवी आणि उर्मिला मातोंडकर दिसल्या होत्या.

दरम्यान अभिनेत्री श्रीदेवीने 1996 मध्ये चित्रपट निर्माता बोनी कपूर यांच्याशी लग्न केले, त्यानंतर ते दोघेही जान्हवी कपूर आणि खुशी कपूरचे पालक झाले. त्याचवेळी 2018 मध्ये श्रीदेवीचे निधन झाले. श्रीदेवी यांच्या निधनाने सिने जगतावर शोककळा पसरली होती.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा –

सुष्मिताच्या हॉटनेसने ललित मोदी क्लिनबोल्ड, व्हायरल व्हिडिओवर दिलेल्या ‘त्या’ कमेंटची रंगली चर्चा

‘नागिण’ मालिकेने ‘या’ अभिनेत्रींना केले मालामाल, मानधनाची रक्कम ऐकून घालाल तोंडात बोटे

‘लग्नानंतर पतीवर अवलंबून राहणे चुकीचे की बरोबर?’, चाहत्याच्या प्रश्नावर काय म्हणाली विद्या बालन?

हे देखील वाचा