Monday, April 15, 2024

‘खुपते तिथे गुप्ते’च्या मंचावर संजय राऊतांचं मोठ भाष्य; म्हणाले, “जणूकाही कसाबलाच पकडायला…”

गेल्या काही दिवसांपासून झी मराठी वाहिनीवरील ‘खुपते तिथे गुप्ते’ हा कार्यक्रम चांगलाच धुमाकूळ घालत आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गायक अवधूत गुप्ते करत आहे. या कार्यक्रमात अनेक सेलिब्रेटींनी हजेरी लावली आहे. तसेच राजकीय नेते मंडळी देखील या मंचावर झळकत आहे. काही दिवसांपुर्वी नारायण राणे आणि राज ठाकरे यांनी या शोमध्ये हजेरी लावली होती. त्यांच्या पाठोपाठ आता नुकतेच शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी देखील हजेरी लावली आहे. तेव्हाच्या प्रोमोमधील एक व्हिडिओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहे.

तो प्रोमो चांगलाच चर्चेचा विषय ठरत आहे. या प्रोमोमध्ये दिसत आहे की, संजय राऊत (Sanjay Raut) हे नारायण राणे यांच्या विषयी काहीतरी सांगत आहेत. त्यामुळे या प्रोमोने सोशल मीडियावर सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्याच बरोबर संजय राऊत यांनी राजकीय परिस्थीतीवर देखील दिलखूलास गप्पा मारल्या. त्यावेळी त्यांनी ठाकरे कुटुंबाशी असलेल्या संबंध विषयी काही गोष्टी सांगितल्या. तसेच, कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यावर संजय राऊत यांनी ईडीच्या कारवाईबद्दल खुलासा केला.

संजय राऊत म्हणाले की,”खोट्या प्रकरणात मला मुद्दाम गुंतवले गेले होत. त्यामुळे मी राजकीय सुडाचे बळी ठरलो. नव्या सरकारची स्थापना करताना संजय राऊत बाहेर दिसता कामा नये, असा आदेश दिल्लीतून देण्यात आला होता. त्यामुळे 24 तासाच्या आत मला या खोट्या प्रकरणा खाली अटक करण्यात आले होते. ईडीच्या आधिकाऱ्यांनी सकाळी 7 वाजता धाडी टाकल्या. तेव्हा मी तिथेच राहत होतो. तो संपूर्ण परिसर सील केला होता. त्यांना जणूकाही कसाबलाच पकडायच आहे, असे वातावर तयार केले होते”

तसेच, “मी त्या अधिकाऱ्यांना सांगितले की, ही नौटंकी बंद करा. मला माहीत आहे की, तुम्हाला मला अटक करायच आहे. सामानाची नासधूस करण्यापेक्षा मला घ्या आणि निघा. तुम्ही फार चुकीच्या माणसासोबत पंगा घेतला आहे. मी झुकनार नाही, तुम्ही मला अटक करा,असे म्हणत संजय राऊत यांनी ईडीच्या कारवाईबद्दल खुलासा केला. (Sanjay Raut made a big comment on the stage of ‘Khupte Atal Gupte’)

अधिक वाचा-
व्हायरल फोटोंनंतर गेहना वशिष्ठने फैजानसोबत लग्न न झाल्याचा केला खुलासा; म्हणाली, ‘माझ्या बॉयफ्रेंडचे नाव..’
स्वतःचाच “त्या” सिनेमातील अभिनय पाहून दुखावलेल्या सतीश शाह यांनी ‘या’ कारणासाठी सोडले अभिनय क्षेत्र? 

हे देखील वाचा