Thursday, June 13, 2024

भारत-पाकिस्तान सामन्यात अभिनेत्री उर्वशी रौतेलाची हजेरी; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

प्रसिद्ध अभिनेत्री उर्वशी रौतेलाने तिच्या अभिनयाच्या जोरावर खूप प्रसिद्धी मिळवली आहे. ती सोशल मीडियावर सतत सक्रिय असते. ती तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते. तिच्या पोस्टवर चाहते लाईक आणि कमेंट करत असतात. सध्या उर्वशी एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. तिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहेत. आयसीसी एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक 2023 मध्ये आज भारत आणि पाकिस्तान यांच्यात महामुकाबला रंगला आहे.

या सामन्यादरम्यानचा (India-Pakistan Match) एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री उर्वशी रौतेला (Urvashi Rautela) टीम इंडियाला चिअर करण्यासाठी अहमदाबादच्या स्टेडियममध्ये पोहोचली आहे. उर्वशीने या प्रसंगाचा एक लेटेस्ट व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. परिस्थिती अशी आहे की, आता उर्वशी रौतेलाचा हा व्हिडिओ सर्वत्र चर्चेचा विषय बनला आहे.

उर्वशी रौतेलाचे क्रिकेटवरील प्रेम सर्वश्रुत आहे. अशा स्थितीत भारत विरुद्ध पाकिस्तान विश्वचषक सामन्यादरम्यान स्पॉट झालेल्या उर्वशीने पुन्हा एकदा या खेळाबद्दलची आवड दाखवली आहे. शनिवारी उर्वशी रौतेलाने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर एक नवीनतम व्हिडिओ शेअर केला. या व्हिडिओमध्ये उर्वशी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये दिसत असल्याचे पाहायला मिळत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Urvashi Rautela (@urvashirautela)

1 लाखाहून अधिक प्रेक्षकांनी खचाखच भरलेल्या या स्टेडियममध्ये उर्वशी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संघर्षाचा आनंद घेताना दिसत आहे. यावेळी, उर्वशी रौतेलाने स्टायलिश निळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे, जी टीम इंडियाला सपोर्ट करण्यासाठी इथे पोहोचली आहे, हे दाखवण्यासाठी पुरेसा आहे. पाकिस्तानसोबतच्या या सामन्यात टीम इंडिया आतापर्यंत आघाडीवर आहे, त्यामुळे उर्वशी खूप आनंदी दिसत आहे. तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहे. (Actress Urvashi Rautela appearance to watch the India-Pakistan match went viral on social media)

आधिक वाचा-
अनन्या पांडेचे फोटो पाहून चाहत्यांच्या काळजाचा तुकडाच पडला; पाहा झलक
‘अभिनेता होऊन फक्त पैसा, प्रसिद्धी…’, किरण मानेंची पोस्ट प्रचंड व्हायरल, लोक म्हणाले, ‘किरणदा…’

हे देखील वाचा