Wednesday, July 3, 2024

उर्वशीच्या नजरेचा तीर अन् चाहत्यांच्या थेट काळजावर घाव! ‘हा’ व्हिडिओ पाहून तुम्ही ‘त्या’ प्रियालाही विसराल

बॉलिवूड अभिनेत्री आणि ब्युटी आयकॉन उर्वशी रौतेला बर्‍याचदा आपल्या मौल्यवान ड्रेस आणि दागिन्यांमुळे चर्चेत असते. ती नेहमी वेस्टर्न ड्रेस परिधान करून चाहत्यांची मने जिंकते. पण आता उर्वशी रौतेलाचा एक असा व्हिडिओ व्हायरल झाला आहे, जो बघून तुम्ही प्रिया प्रकाश वॉरियरला विसरून जाल.

‘पंजाबी कुडी’ बनून शेअर केला व्हिडिओ
या व्हिडिओमध्ये उर्वशी रौतेला पंजाबी कुडीच्या वेशात दिसली आहे. तिने पंजाबी सलवार सूट घातला आहे, ज्यावर लांब वेणी घातली आहे. त्याचबरोबर भारी-भरकम ज्वेलरीसह उर्वशीचा हा लूक खूपच सुंदर दिसत आहे.

डोळा मारून जिंकली लाखो चाहत्यांची मने
या व्हिडिओमध्ये उर्वशी रौतेला आपल्या हाताने तिची लांब वेणी फिरवताना दिसत आहे. तिचे एक्सप्रेशन पाहण्यासारखे आहेत. दरम्यान, ती हळूहळू तिचा एक डोळा बंद करते. उर्वशी रौतेलाची ही स्टाईल तिच्या चाहत्यांना इतकी आवडली की काही तासांतच हा व्हिडिओ 7 लाख 78 हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे.

या चित्रपटांमध्ये दिसणार आहे उर्वशी
तिच्या कामाबद्दल बोलायचं झालं, तर उर्वशी रौतेला ‘व्हर्जिन भानुप्रिया’मध्ये दिसली होती. ती लवकरच ‘ब्लॅक रोज’ मध्येही दिसणार आहे, जो एक थ्रिलर चित्रपट असणार आहे. हा चित्रपट हिंदी आणि तेलुगु भाषेत प्रदर्शित होणार आहे. नुकतेच, उर्वशी रौटेलाच्या तमिळ रिमेक फिल्म ‘थिरुट्टू पायल 2’ च्या फर्स्ट लूकवर बरीच चर्चा रंगली. याशिवाय ती लवकरच जॉन अब्राहमसोबत पुढच्या चित्रपटात दिसणार आहे. यावेळी अभिनेत्री उर्वशी रौतेला रणदीप हुड्डासोबत ‘इंस्पेक्टर अविनाश’ या सीरिजमध्ये पाहायला मिळणार आहे. तिने नुकतेच त्याचे शूटिंग पूर्ण केले आहे.

हेही वाचा-

अरे बापरे! उर्वशी रौतेलाच्या या ड्रेसची किंमत ऐकून तुम्ही अवाक व्हाल

गरीबांना कोणीतरी कपडे द्या? रिप्ड जीन्स घातल्यामुळे उर्वशी रौटेला सोशल मीडियावर झाली जोरदार ट्रोल

बडे लोक बडी बाते! अभिनेत्री उर्वशीने अवघ्या १५ मिनिटांसाठी घातलेल्या ड्रेसची किंमत वाचून अवाक् व्हाल; पाहा फोटो

हे देखील वाचा