Tuesday, April 16, 2024

बडे लोक बडी बाते! अभिनेत्री उर्वशीने अवघ्या १५ मिनिटांसाठी घातलेल्या ड्रेसची किंमत वाचून अवाक् व्हाल; पाहा फोटो

बॉलिवूडची हॉट आणि ग्लॅमरस अभिनेत्री म्हणून उर्वशी रौतेलाची ओळख आहे. उर्वशी तिच्या सौंदर्यामुळे आणि तिच्या अंदाजमुळे खूप लोकप्रिय आहे. ती नेहमी कोणत्या न कोणत्या कारणांसाठी चर्चेत असते. कधी महागडा ड्रेस घालून फोटोशूट केल्यामुळे, तर कधी तिच्या जास्त मानधनामुळे. आता पुन्हा उर्वशी चर्चेत आली आहे ते तिच्या महागड्या ड्रेसमुळे.

काहीच दिवसांपूर्वी उर्वशीने एका नवीन वर्षाच्या कार्यक्रमात काही मिनिटे हजेरी लावण्यासाठी काही कोटींची मागणी केल्याची बातमी आली होती. ३१ डिसेंबरला नवीन वर्षाच्या स्वागतासाठी दुबईमध्ये आयोजीत एका कार्यक्रमात उर्वशीने १५ मिनिटे हजेरी लावून काही प्रस्तुती करण्यासाठी तब्बल ४ कोटी रुपये मागितले होते. मागच्याच आठवड्यात ही बातमी आली असताना, आता या कार्यक्रमाशी संबंधित दुसरी बातमी आली आहे.

उर्वशी या कार्यक्रमात हजेरी लावण्यासाठी तिने जो ड्रेस घातला होता त्याची किंमत ३२ लाख एवढी होती. झाले ना डोळे मोठे. उर्वशीने या कार्यक्रमात लाल रंगाचा ड्रेस परिधान केला होता. हा ड्रेस प्रसिद्ध ड्रेस डिझायनर मायकल सिनकोने डिझाइन केला होता.

या ड्रेसला तयार होण्यासाठी १५० तासांचा कालावधी लागला असल्याची माहिती मिळाली आहे. तसे पाहिले तर उर्वशीने पहिल्यांदाच एवढा महाग ड्रेस घातला असे नाही. यापूर्वी देखील तिने अनेक महागडे ड्रेस किंवा अँक्सेसरीज घातल्या आहेत.

अरब फॅशन शो मध्ये शो स्टॉपर होणारी उर्वशी पहिली भारतीय महिला ठरली आहे. या शो मध्ये तिने घातलेल्या ड्रेसची तर चर्चा झालीच सोबत उर्वशीने यावेळेस जो मेकअप केला होता त्यात तिने जो आय शॅडो लावले होते ते २४ कॅरेट सोन्याचे होते. शिवाय उर्वशीने ‘सोल अरेबिया’ या अरबी मॅगझीनसाठी फोटोशूट करताना ५० लाखांचा ड्रेस घेता होता. त्या मॅगझीनच्या कव्हर पेजवर झळकणारी उर्वशी पहिली अभिनेत्री होती.

उर्वशीच्या वर्कफ्रंट बद्दल बोलायचे झाले तर उर्वशी शेवटची ‘वर्जिन भानुप्रिया’ या सिनेमात दिसली होती. ती लवकरच तेलगू आणि हिंदी भाषेत बनणाऱ्या ‘ब्लॅकरोज’ सिनेमात दिसणार आहे.

हे देखील वाचा