गरीबांना कोणीतरी कपडे द्या? रिप्ड जीन्स घातल्यामुळे उर्वशी रौटेला सोशल मीडियावर झाली जोरदार ट्रोल


उर्वशी रौतेला एक सौंदर्यवती आहे आणि तिलाही हे चांगलेच माहित आहे. ही अभिनेत्री नेहमीच टोन्ड फिगरमध्ये दिसते आणि याचसाठी ती जिममध्ये जोरदार घाम गाळते. सौंदर्य आणि तंदुरुस्तीच्या या नियोजनामुळेच ती प्रत्येक प्रकारच्या ड्रेससाठी योग्य बनवते. म्हणूनच ही अभिनेत्री ट्रेडिशनलपासून ते वेस्टर्न कपड्यांपर्यंत अगदी सगळ्यांमध्ये अप्रतिम दिसते. तथापि, कधीकधी ही फॅशनसेन्स तिच्यासाठी ट्रोल होण्याचे कारण बनते आणि यावेळी देखील असे घडले आहे.

रिप्ड जीन्समध्ये उर्वशीने शेअर केले फोटो
उर्वशी रौटेलाने इंस्टाग्रामवर तिचे स्टायलिश फोटो शेअर केले आहेत. यात ती हेलिकॉप्टरसमोर पोज देताना दिसली आहे. फोटो शेअर करताना, अभिनेत्रीने सांगितले की तिने तिच्या ‘लेटेस्ट चीकी फॅशन ट्रेंड’ साठी बम रिप जीन्स परिधान केली आहे. यात असेही लिहिले आहे की ती जरी चीकी असली तरी फॅशनच्या बाबतीत ब्रेव आहे.

फोटोंमध्ये उर्वशी ब्लॅक कलरच्या ब्रालेट टॉपमध्ये दिसत आहे. यासह तिने हाय राईज जीन्स परिधान केली. या स्ट्रेटकट जीन्समध्ये फ्रंट कट आणि रिप्ड डिझाइन होती. उर्वशीने या लूकला गुलाबी रंगाच्या स्लिंग बॅग, ब्लॅक स्नीकर्स आणि स्टायलिश ग्लासेससह पूर्ण केले आहेे. तिने केस मेसी ठेवत न्यूड मेकअप केला होता जो लुकनुसार परिपूर्ण दिसत होता.

लोकांनी उडवली खिल्ली
एकीकडे उर्वशीच्या या लूकला चाहत्यांकडून चांगल्या लाईक्स मिळत असताना दुसरीकडे काही लोक तिची खिल्ली उडवताना देखील दिसले. त्यांनी अभिनेत्रीच्या जीन्सच्या डिझाईनवर निशाना साधला. ‘खुप गरीब आहे बिचारी’, ‘पँटही फाटली आहे’, ‘आजवर इतकी गरिबी बघीतली नव्हती’, तर काहीजणांनी ‘कपडे द्या’ आणि ‘माझ्याकडून पँट घेऊन जा’ यासारखे टोमणे मारले आहेत.

तसं पाहिलं तर उर्वशी रौटेलाच एकमेव किंवा पहिलीच अभिनेत्री नाही जिला रिप्ड डिझाइन जीन्स परिधान केल्यामुळे ट्रोलिंगचा सामना करावा लागला.

सारा देखील झाली होती ट्रोल

अशी जीन्स परिधान केल्यामुळे सारा अली खान देखील जोरदार ट्रोल झाली होती. सारा हलक्या पिवळ्या रंगाच्या डेनिमसह वन शोल्डर टॉप परिधान केलेली दिसली, जिने स्नीकर्स आणि फंकी टच इयररिंग्जसह स्टायलिश फिनिश दिली. साराच्या जीन्सची लोकांनी खिल्ली उडविली आणि कमेंट बॉक्समध्ये तिची ‘भिकारी’ अशी हेटाळणी केली होती.

रिप्ड जीन्सचे प्रेम अनुष्कालाही पडले होते भारी

 

तसेच, अनुष्का शर्मा देखील या ट्रोलिंगला बळी पडली होती. तिला फाटलेली जीन्स खूपच आवडते, यामुळे तिला बर्‍याचदा त्यात स्पॉट केले गेले आहे. यापैकी काही डिझाईन्स अश्या होत्या की लोक त्यांना पचवू शकले नाहीत आणि त्यांनी फोटो शेअर करून अभिनेत्रीची खिल्ली उडवली.

मलायका देखील पडली आहे बळी
जीन्समुळे ट्रोल होत असलेल्या सुंदऱ्यांच्या या यादीमध्ये मलायका अरोराचाही समावेश आहे. ती एकदा अशा जीन्समध्ये दिसली होती, ज्याचा अधिकतर भाग फाटलेला होता. हेच कारण होते ज्यामुळे ती ट्रोल झाली होती.


Leave A Reply

Your email address will not be published.