Friday, December 5, 2025
Home बॉलीवूड ‘दिल ये जिद्दी है!’ थेट रिंगमध्ये बॉक्सरला भिडली उर्वशी रौतेला, अभिनेत्रीने मारले पंचवर पंच, जबरदस्त व्हिडिओ व्हायरल

‘दिल ये जिद्दी है!’ थेट रिंगमध्ये बॉक्सरला भिडली उर्वशी रौतेला, अभिनेत्रीने मारले पंचवर पंच, जबरदस्त व्हिडिओ व्हायरल

बॉलिवूडमध्ये अभिनेत्री उर्वशी रौतेलाने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. अभिनयाव्यतिरिक्त तिच्या व्हिडिओ आणि फोटोलाही चाहते खूप पसंत करतात. उर्वशी तिच्या स्टाईलमुळेच नव्हे, तर तिच्या सौंदर्यामुळेही चाहत्यांच्या मनावर राज्य करते. उर्वशी दरदिवशी सोशल मीडियावर तिचे नवनवीन पोस्ट शेअर करते, जे बरेच व्हायरल होतात. याप्रमाणे अभिनेत्रीचा हा ताजा व्हिडिओही व्हायरल होऊ लागला आहे, ज्यामध्ये ती बॉक्सिंग करताना दिसत आहे. ती या व्हिडिओमध्ये बॉक्सरला पंचवर पंच मारताना दिसत आहे.

खरं तर, उर्वशी रौतेलाने इंस्टाग्रामवर ३६ मिलियन फॉलोवर्स पूर्ण झाल्याच्या आनंदात हा व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओ शेअर करत तिने कॅप्शन दिले की, “३६ दशलक्ष लव्ह…सेलिब्रेशन्स…तुम्हा सर्व ३६ दशलक्ष चाहत्यांसाठी माझे आवडते बॉडी स्कल्प्टिंग वर्कआउट. खरा आनंद, तुम्हा सर्वांना खूप प्रेम.”

उर्वशीची ही पोस्ट तिच्या चाहत्यांना खूप आवडली आहे. इंस्टाग्रामवर ३६ मिलियन फॉलोअर्स पूर्ण झाल्याबद्दल तिचे अभिनंदनही केले जात आहे. तसेच व्हिडिओला आतापर्यंत २ लाख ९० हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.

उर्वशी रौतेलाच्या व्हिडिओवर एका चाहत्याने कमेंट करत लिहिले की, “प्रॅक्टिस स्त्रीला उत्तम बनवते. आपल्या आयुष्यात काहीतरी करण्याची इच्छा असलेल्या अशा सर्व स्त्रियांसाठी तू एक आदर्श आहेस.” त्याचवेळी, दुसर्‍या युजरने लिहिले आहे, “दिल ये जिद्दी है.” उर्वशीच्या या पोस्टवर अशा बर्‍याच कमेंट्स येत आहेत.

वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर उर्वशीने ‘हेट स्टोरी 4’, ‘ग्रेट ग्रँड मस्ती’, ‘सनम रे’ सारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. याशिवाय आता ती तमिळ फिल्म इंडस्ट्रीमध्ये प्रवेश करणार आहे. तिने सनी देओलसोबत ‘सिंग साब द ग्रेट’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. यात अमृता राव आणि प्रकाश राज हेदेखील मुख्य भूमिकेत होते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-राहुल वैद्य अन् दिशा परमारचे बहुप्रतिक्षित गाणे झाले रिलीझ; तीनच दिवसात मिळाले १ कोटींपेक्षाही अधिक व्ह्यूज

-मातीशी नाळ जोडलेला अभिनेता पंकज त्रिपाठीने सर्वांसमोर केला बिहारचा ‘लौंडा’ डान्स, ‘द कपिल शर्मा शो’मधील व्हिडिओ व्हायरल

-खेसारी लाल यादवच्या ‘पड़ोसन शोषण करती है’ गाण्याचा यूट्यूबवर राडा! पार केला २८ लाख व्ह्यूजचा टप्पा

-बोल्डनेससाठी चर्चेत राहणारी अभिनेत्री लागली ढसा ढसा रडू, पाहा तिचा व्हायरल व्हिडिओ

हे देखील वाचा