Thursday, June 13, 2024

उर्वशी रौतेलाचे ‘ते’ ट्विट व्हायरल; नेटकरी म्हणाले,’थोडं भान ठेव, दारू पिऊन…’

मनोरंजन विश्वात काम करणाऱ्या कलाकारांचे सतत वेगवेगळे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. या कलाकारांकडे त्यांच्या फॅन्सचे सतत डोळे असतात. कलाकार कुठे चुकताय हे पाहण्यात फॅन्सला मजा येते आणि मग त्यावरून त्यांना ट्रोल केले जाते. अशा ट्रोलिंगचा सामना सगळेच कलाकार सतत करत असता. सध्या अशा प्रकारच्या ट्रोलिंगला अभिनेत्री उर्वशी रौतेला सामोरी जात आहे. उर्वशी सतत ट्रोलरच्या निशण्यावर असते.

उर्वशी (Urvashi Rautela ) सोशल मीडियावर सतत सक्रिय असते. ती तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करते. त्यामुळे ती ट्रोलरच्या निशाण्यावर येते. उर्वशीचा फिटनेस आणि सौंदर्य पाहून चाहते तिच्या प्रेमात पडतात. उर्वशीने नुकतेच एक ट्विट केले आहे. जे सोशल मीडियावर चांगलच व्हायरल होत आहे. या ट्विटवरून उर्वशीला खूप ट्रोल केले जात आहे. तिने एक फोटो पोस्ट केला आहे.

उर्वशीने सोशल मीडियावर पवन कल्याणसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. फोटो शेअर करताना तिने लिहिले की,”आंध्र प्रदेशच्या आदरणीय मुख्यमंत्र्यांसोबत स्क्रीन स्पेस शेअर करताना आनंद झाला. आमच्या #BroTheAvatar चित्रपटात 28 जुलै रोजी प्रदर्शित होत आहे.” तिने केलेल्या या ट्विटमधील चुकीमुळे तिला खूप ट्रोल केले जात आहे. सध्याचे आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी आहेत.

उर्वशीच्या या ट्विटवर कमेंटचा वर्षाव होत आहे. तिच्या या ट्विटवर कमेंट करताना एका युजरने लिहिले की,”ट्वीट करताना थोडं भान ठेव, दारू पिऊन ट्वीट करू नकोस.” तर आणखी एका फेक अकाऊंटवरून कमेंट करत उर्वशीचे आभार मानले आहेत. त्याने लिहिले की, “प्रिय उर्वशी रौतेला, मला ट्विटरवर आंध्र प्रदेशचा मुख्यमंत्री बनवल्याबद्दल धन्यवाद.”

अधिक वाचा- 
“कॅन्सरमध्ये वाचलेला व्यक्ती नेहमीच…” कॅन्सर सर्वाइवर अभिनेत्रीची ‘ती’ पोस्ट व्हायरल
प्रभासला आणखी एक धक्का! फेसबुक अकाउंट हॅक केल्यानंतर हॅकर्सने केले ‘हे’ काम

हे देखील वाचा