Tuesday, July 9, 2024

शॉर्ट गोल्डन ड्रेस अन् हाय हील्समध्ये उर्वशीने केला कातिलाना डान्स; चाहता म्हणतोय, ‘मला पण शिकायचाय!’

उर्वशी रौतेला एक प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री आहे, जी सोशल मीडियावर देखील खूप सक्रिय असते. सोशल मीडियावर उर्वशी रौतेलाला मोठ्या संख्येने चाहते फॉलो करतात आणि ती देखील तिच्या चाहत्यांना निराश न करता दररोज त्यांच्यासाठी नवनवीन पोस्ट शेअर करत राहते. अशातच अभिनेत्रीने तिचा एक नवीन व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यात ती खूपच ग्लॅमरस दिसत आहे. उर्वशीची पोस्ट शेअर होताच सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.

उर्वशी रौतेलाने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये ती शॉर्ट गोल्डन ड्रेस आणि हाय हिल्समध्ये अतिशय कातिलाना स्टाइलमध्ये नाचताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये एक व्यक्तीही तिच्यासोबत नाचताना दिसत आहे. उर्वशी रौतेलाचा हॉट अंदाज पाहून चाहते भुरळून गेले आहेत, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. अल्पावधीतच अभिनेत्रीच्या पोस्टवर ३५ हजारांहून अधिक लाइक्स आले आहेत. व्हिडिओ पाहून नेटकरी उर्वशीच्या डान्सचे आणि तिच्या स्टाईलचे कौतुक करत आहेत. (urvashi rautela killer dance video in short golden dress and high heels goes viral)

उर्वशी रौतेलाच्या पोस्टवर कमेंट करत एका सोशल मीडिया युजरने लिहिले आहे, “तू खूप सुंदर दिसतेस.” तर त्याचवेळी दुसऱ्या एका युजरने लिहिले की, ‘मलाही डान्स शिकव.” याशिवाय अनेक युजर्स उर्वशीच्या या व्हिडिओवर फायर आणि हार्ट इमोजी बनवून कमेंट करत आहेत.

वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, अभिनेत्री येत्या काही दिवसांत रणदीप हुड्डासोबत ‘इन्स्पेक्टर अविनाश’ या आगामी वेब सीरिजमध्ये झळकणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-अभिनयात येण्यापूर्वी ‘हे’ काम करायची श्रुती हासन; म्हणाली, ‘कोणालाही माहित नव्हते की…’

-Bigg Boss OTT: लाजून लाल झाली शमिता, जेव्हा करणने ‘हॉटनेस’वर प्रश्न विचारताच राकेश म्हणाला…

-‘टायगर ३’साठी कॅटरिना कैफ रशियाला रवाना; स्टंट सीन शूट करण्यासाठी घेतीये प्रचंड मेहनत

हे देखील वाचा