बाबो!! एअरपोर्टवर स्पॉट झाली उर्वशी रौतेला; अभिनेत्रीच्या हॅन्डबॅगची किंमत ऐकाल, तर सरकेल पायाखालची जमीन


कलाकार त्यांच्या अभिनय, चित्रपट, सोशल मीडियावरील पोस्ट यासर्व गोष्टींसाठी नेहमी ओळखले जातात. मात्र, यासर्वांसोबत कलाकार अजून एका गोष्टीसाठी खूप प्रसिद्ध आहेत आणि ते म्हणजे कलाकारांचे महागडे शौक किंवा त्यांच्या महागड्या वस्तू. कलाकारांकडे जर आपण पाहिले तर आपल्या लक्षात येईल, कलाकार अगदी छोट्या गोष्टीपासून मोठ्या गोष्टीपर्यंत सर्वच खूप महाग आणि ब्रँडेड वापरतात. त्यांच्या या वस्तू जेव्हा मीडियामध्ये स्पॉट केल्या जातात, तेव्हा त्याची मीडियामध्ये आणि सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगते. याबाबतीत अभिनेत्री चांगल्याच पुढे आहेत. त्यांच्या कपड्यांपासून ते हॅन्डबॅग्स, गॉगल्स, ज्वेलरी, सॅंडल आदी सर्वच गोष्टी मीडियामध्ये गाजतात. सध्याच अशाच एका गोष्टीसाठी अभिनेत्री, मॉडेल उर्वशी रौतेला देखील खूप गाजत आहे.

नुकतेच उर्वशीला एअरपोर्टवर स्पॉट करण्यात आले. तिचा हा एअरपोर्ट लूक चांगलाच गाजत आहे. आपल्या स्टाइल स्टेटमेंटसाठी नेहमी ओळखली जाणारी उर्वशी तिच्या एअरपोर्ट लूकसाठी देखील भाव खाऊन गेली. यावेळी उर्वशी गुलाबी रंगाचा क्रॉप टॉप आणि हिरव्या रंगाच्या पॅंटमधे दिसली. या ड्रेसमध्ये ती अतिशय सुंदर आणि आकर्षक दिसत होती. मात्र यामध्ये लूकमध्ये सर्वात जास्त लक्षवेधी ठरली ती तिची हिरव्या रंगाची चेनल हॅन्डबॅग. ही बॅग एक चेनल एमराल्ड ग्रीन कॅव्हियार रजाईची हॅन्डबॅग आहे. या बॅगेची किंमत जवळपास १० लाख रुपये इतकी आहे. यासोबतच उर्वशीने मास्क घातले होते, ज्यावर तिच्या नावाचे अक्षर लिहिले होते. (urvashi rautela spotted at airport with handbag worth 10 lakhs)

उर्वशीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले तर ती लवकरच एका मोठ्या चित्रपटातून तामिळ इंडस्ट्रीमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे. या चित्रपटात ती एका माइक्रोबायोलॉजिस्ट आणि एका आईआईटीयनची भूमिका साकारणार आहे. उर्वशीचे काही दिवसांपूर्वी गुरु रंधावासोबत ‘डूब गए’ आणि मोहम्मद रमजानसोबत ‘वर्साचे बेबी’ हे गाणे प्रदर्शित झाले असून, याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. यासोबतच उर्वशी ‘इंस्पेक्टर अविनाश’ वेबसिरीजमधून रणदीप हुडासोबत ओटीटी प्लॅटफॉर्मवर पदार्पण करत आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

कार्तिक आर्यनच्या नव्या चित्रपटाची घोषणा; आता पायलट बनून अभिनेता जिंकणार रसिकांची मनं

राज कुंद्रा प्रकरणात शिल्पा शेट्टीचा ‘हंगामा २’ झाला प्रदर्शित; चित्रपटावर होणार परिणाम?

‘आयुष्यभर तुरुंगात सड’ म्हणत राज कुंद्रावर आरोप लावणारी पुनीत कौर नक्की आहे तरी कोण? वाचा


Leave A Reply

Your email address will not be published.