‘टाईमपास’ चित्रपटात ‘प्राजक्ता’ची भूमिका साकारून केतकी माटेगावकरने अवघ्या प्रेक्षकवर्गाला वेड लावले होते. लोभसवाणा चेहरा आणि गोंडस स्मितद्वारे, ‘प्राजु’ने लाखो चाहत्यांची मने चोरली. अभिनयाव्यतिरिक्त ती आपल्या आवाजामुळेही चाहत्यांच्या मनावर राज्य करते. ती सोशल मीडियावर देखील खूप सक्रिय राहते आणि आपले नवनवीन लुकमधील फोटो शेअर करत, सोशल मीडियाचे लक्ष वेधत असते. अलीकडेच तिने पोस्ट केलेला एक फोटो आता चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे.
हा फोटो केतकीने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. ज्यात ती खूपच सुंदर दिसत आहे. फोटोत तिने लाल रंगाचा प्रिंटेड क्रॉप टॉप व त्याच्यासह त्याच रंगाचे स्कर्ट परिधान केले आहे. चेहऱ्यावर परफेक्ट असा मेकअप करून तिने फोटोसाठी हॉट पोझ दिली आहे. सोज्वळ प्राजूचा हा हॉट अंदाज चाहत्यांना चांगलाच भावला आहे.
https://www.instagram.com/p/CP5aAoCjAAs/?utm_source=ig_web_copy_link
अभिनेत्रीच्या चाहत्यांना तिचा हा फोटो बराच पसंत पडलाय. नेटकरी फोटोवर कमेंट्स करून आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. एका चाहत्याने केतकीचे कौतुक करत लिहिले, “खूपच गोड आणि सुंदर दिसतेय केतकी.” तर दुसरा चाहता म्हणतोय, “तुझे डोळे प्रेमाची आणि दयाळूपणेची भाषा बोलतात.”
केतकीने २०१२ साली ‘शाळा’ या चित्रपटाद्वारे मराठी सिनेसृष्टीत पाऊल ठेवले होते. त्यानंतर तिने बऱ्याच मराठी चित्रपटात भूमिका साकारून आपले नाव कमावले आहे. तिच्या चित्रपटांच्या यादीत ‘आरोही’, ‘काकस्पर्श’, ‘तानी’, ‘टाईमपास’, ‘टाईमपास २’, ‘फुंतरू’ यांचा समावेश आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…